Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील ‘हे’ गाव बं

अजित पवार विमान अपघात: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती (Baramati news) तालुक्यातील लोणी भापकर हे गाव रविवारी बंद असणार आहे. यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे. अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत, असे  पत्र लोणीभापकर ग्रामपंचायतीने पोलिसांना दिले आहे. (Maharashtra Politics news)

अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना अपघात झाला होता. त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यानंतर त्यांचा विमानाचा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. 29 जानेवारीला बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी बारामतीत प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत शोककळा पसरली होती. तसेच अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड पोकळी निर्माण झाली होती.

आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर मांडणी केली होती. यावेळी त्यांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्याबाबत संशय व्यक्त केला होता. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधन होते. त्यामुळे मोठा स्फोट झाला. वैमानिक सुमित  कपूर यांनी विमान जमिनीवर मुद्दाम आदळले असावे, अशी शक्यताही रोहित पवार यांनी बोलून दाखवली होती.

Amol Mitkari: अमोल मिटकरींचा रोहित पवारांना पाठिंबा

आदरणीय दादांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर यावे याकरिता तांत्रिक बाबी आणी पुरावे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणून विचार करायला भाग पाडणाऱ्या ,आमदार श्री रोहित पवार यांनी उभारलेल्या लढ्यात आम्ही दादांवर निष्ठा असणारे सर्व सामान्य कार्यकर्ते संपुर्ण ताकदीनीशी न्याय मिळेपर्यंत व सत्य समोर येईपर्यंत या लढ्यात कायम सोबत आहोत.सत्य समोर आणणे हीच दादांना खरी आदरांजली व दादांप्रती निष्ठा ठरेल, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

आदरणीय दादांच्या विमानासाठी नियुक्त केलेले साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट त्यादिवशी कुठे अडकले होते व आता कुठे आहेत, बस इतकीच माहिती मिळावी. ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर झाल्यावर मिळाला तरी हरकत नाही, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे.

आणखी वाचा

पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.