मतचोरी हे फेक नरेटिव्ह, तुमची सत्ता आली तेव्हा मतचोरी EVM दिसलं नाही, अजित पवारांचा टोला

अजित पवार: विरोधकांनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली. विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत. मतचोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहे. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम (EVM) आणि मतचोरीचे मुद्दे समोर आले जातात, यात काहीही तथ्य नाही असे अजित पवार म्हणाले.

प्रभाग रचना कशीही असो, जो लोकांची कामं करतो त्याला फरक पडत नाही

प्रभाग रचनांमध्ये प्लस मायनस 10 टक्के इकडे-तिकडे होते. माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे, की प्रभाग रचना कशीही असली तरी जो लोकांची कामं करतो, त्याला याचा फारसा फरक पडत नसतो. मुळातच प्रत्येकाला हवी तशी रचना होत नाही असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

भारत आणि पाकिस्तान मॅचवर सकाळी भोंगा वाजवणारी व्यक्ती टीका करतेय

भारत आणि पाकिस्तान मॅचवर कोण टीका करत तर सकाळी भोंगा वाजवणारी व्यक्ती, असे म्हणत अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना टोला लगावला. तुम्ही पण कोणत्या गोष्टीला प्रसिद्धी देता. आता काहीचं म्हणणे आहे की भारत-पाकिस्तान मॅच व्हावी, खेळात कोणतंही राजकारण आणू नये. तर कोण म्हणतं, की पाकिस्तान कुरघोड्या करत, अनेकदा हल्ले करत. त्यामुळं त्यांच्याशी कोणतेच संबंध ठेऊ नयेत, असं म्हणणारा ही एक वर्ग आहे. असे प्रसंग येतात, तेव्हा दोन बाजू असतात. कोणत्या बाजूने तुम्ही विचार करता, यात उत्तर दडलेलं असतं असे अजित पवार म्हणाले.

सरकार म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाबद्दल चर्चा केलीय

कायदा सुव्यवस्था बिघडू नये, वातावरण शांत राहावं असं प्रत्येक सरकारला वाटत असते. पण समोरचा व्यक्ती कसा प्रतिसाद देतो, त्यावर हे अवलंबून असते. मात्र प्रत्येक काळजी घेणं हे सरकारच काम असतं. सरकार म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाबद्दल चर्चा केलेली आहे.

ज्याने त्याने प्रत्येक क्षेत्राला मान-सन्मान द्यायला हवा

किर्तनकार संग्राम भंडारे महाराज आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या वादावर देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. मी अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही. ज्याने त्याने प्रत्येक क्षेत्राला मान-सन्मान द्यायला हवा. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, प्रत्येकानं असं वागलं तर वाद-विवाद होणार नाहीत असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

INDIA Alliance March on Election Commission: मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला

आणखी वाचा

Comments are closed.