सिंचन घोटाळ्यावरुन अजितदादांचा गौप्यस्फोट; राजकारणात खळबळ उडवणारी नेमकी योजना काय होती? खर्च कि
सिंचन घोटाळ्यावर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन (Sinchan Scam) भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरती टीका करत आलं आहे. आता त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं. दरम्यान 1999 ला मी अर्थमंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरूपाचा निर्णय झालेला मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. तसंच 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी १९९६ साली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली.
* या योजनेच्या अंतर्गत मुळा आणि मुठा नदितील चार टीएमसी पाणी पंपांच्या साहाय्याने लिफ्ट करुन पाईप लाईनद्वारे दुष्काळी तालुक्यांना देण्यास मान्यता.
* पुणे जिल्ह्यातील ६३ गावातील २५४९८ हेक्टर शेतीला फायदा होईल असे सांगण्यात आले.
* अजित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार १९९६ ला या प्रकल्पासाठी युती सरकारने ३३० कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.
* मात्र १९९९ ला सत्ताबदल झाला आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री बनले. तेव्हा त्यांना या योजनेचा खर्च वाढविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता पार्टी फंडा साठी १०० कोटी तर अधिकाऱ्यांनी १० कोटी वाढवल्याचे सांगण्यात आले.
* या प्रकल्पासाठी वेळेवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन आतापर्यंत या प्रकल्पासाठी ३९३ कोटी खर्च झाला असुन उरलेल्या कामांसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे .
* २००६ पासुन ही योजना कार्यान्वित झाली आहे
पुरंदर उपसा सिंचन योजनेची योजनेची माहिती
* पुरंदर उपसा सिंचन योजनेची सुधारित प्रशासकीय मान्यतेचा दिनांक 16 जानेवारी 23
* पुरंदर दौंड बारामती हे कमी पर्जन्य छायेचे प्रदेश दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सिंचन योजनेची गरज
* बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याची योजना
* 1998 साली मान्यता मिळाली 2000 च्या दर 250 कोटीची तरतूद करण्यात आले
* 1995 ची प्रकल्पाची मंजूर शासकीय मान्यता 168.93 कोटी
* 2000 साली 250 कोटीची मान्यता
* 2012 साली 23 कोटी
* 2013 साली वीस कोटी
* 14 साली 70 कोटी खर्चाची मान्यता घेण्यात आली असून प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठवला
* 2018 अखेर 393.126 कोटी खर्च
* या योजनेमुळे 63 गावातील 25 हजार 498 हेक्टर क्षेत्रावर परिणाम
* 460.90 कोटीच्या सुप्रमा मागणी मागणीचा प्रस्ताव
* 2017 कोणताही निधी मंजूर न झाल्याने सालीपासून काम बंद
* 2007 पासून मागणीनुसार पाण्याचा पुरवठा लाभ धारकांना करण्यात येत आहे परंतु काम पूर्ण करण्यासाठी सुप्रमा मंजूर करण्याची गरज आहे
आणखी वाचा
Comments are closed.