अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना मुलालाही निवडून आणता आलं नाही, आता अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
Amit Thackeray on Ajit Pawar, मुंबई : “राज ठाकरेंना (Raj Thackeray) स्वत:च्या मुलाला निवडून आणता आलं नाही, आणि गप्पा मारतात. माझा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला, पत्नी देखील निवडून आली नाही. मात्र तो जनतेचा निर्णय होता. आम्ही लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो. मात्र, त्यानंतर मेहनत घेतली”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, आज राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray ) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मला माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा – अमित ठाकरे
अमित ठाकरे म्हणाले, मी अजून खूप लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील. पण एक सांगतो, मी निवडणुकीत हरलो तरी खचलो नाही. या निवडणुकीत मला खूप काही शिकता आले. मला इतर गोष्टींचा फरक पडत नाही. मला माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा. मनसे हा ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा पक्ष आहे. कुठेही एखादा विषय सुटला नाही तर तो राज साहेबांकडे येतो. त्यानंतर तो विषय मार्गी लागतो. प्रत्येक पक्षाला यश हवे असते. आमच्याही आयुष्यात ते येईल. आम्हीही सत्तेत बसू.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्यात, हे राज साहेब आधीपासून सांगतात
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली व रोहित शर्मा आहेत. एवढेच नव्हे तर सचिन तेंडुलकर यांच्यासारखे कोणता बॉल कसा खेळायचा हे त्यांना माहिती आहे. मीही त्यांच्याकडूनच शिकत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्या हे राज साहेब आधीपासून सांगतायत..विधानसभेत जे झालं ते अनपेक्षित होतं, असंही अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरेंचा पराभव
राज ठाकरेंनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. त्यामुळे राज ठाकरेंना हा मोठा धक्का बसला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.