माझा मूड चांगला की वाईट बघू नका, माझ्याकडे कामं घेऊन येत जा: अजित पवार
अजित पवार: माझा मूड चांगला असो किंवा नसो, तुम्ही माझ्याकडे काम करायला येत जा. कधी कधी माझा आवाज चढलेला असतो. पण तुम्ही माझ्या मूडची फिकीर करु नका, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार (Rohit Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही चिमटा काढला. दत्ता भरणे (Dattatray Bharne) यांना घेऊन कैलास भोसले तुम्ही वरचेवर माझ्याकडे या. त्यावेळी माझा मूड कसा आहे, हे बघत बसू नका. कैलास राव तुम्ही एखाद्यावेळी आमच्या भावकीला (राजेंद्र पवार) घेऊन या. कामं करायची म्हणजे नमते घ्या, असे अजित पवार यांनी म्हटले. ते रविवारी पिंपरी चिंचवडध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. काही दिवसांपूर्वी सांगलीतील वाळवा येथील कार्यक्रमात अजित पवार आणि रोहित पवार यांच्या भावकीच्या मुद्द्यावरुन शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे नवे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी अजित पवार यांनी राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही सल्ला दिला. दत्ता भरणे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कृषी मंत्री झाल्यापासून दुचाकीवर फिरतोय, पण मामा सगळे बघत असतात. द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन शेतापासून आता थेट हॉटेल टीप टॉपपर्यंत येऊन पोहचले आहे. जसं जसं संघ विस्तारत चालला आहे, तशा अपेक्षा ही वाढत चालल्या आहेत. कृषी मंत्र्यांचं आत्तापर्यंत सारखं काय न काय तर निघतंय. शेवटी ठरवलं, आता असा कृषीमंत्री शोधू त्याचं काही बाहेर निघायला नको. म्हणून दत्तात्रय भरणेंना शोधले, असे अजित पवार यांनी म्हटले.
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: अजित पवार लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले?
या कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांना झळ बसली, असा आरोप करणाऱ्यांना फटकारले. तुम्ही बऱ्याच मागण्या केल्या. व्यावहारिक मागण्या असाव्यात. अगदीच आर्थिक मागणी असेल तर मी अर्थमंत्री म्हणून गरज असेल तिथं निधी देण्यास अजिबात पुढं-मागे पाहणार नाही. लाडक्या बहिणींबद्दल बऱ्याच बातम्या सुरु आहेत. याबाबत मी महिला बाल कल्याणच्या मंत्र्यांशी बोलणार आहे. निधीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जातायेत. अनेकजण लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको ते पण घेतायेत, याची छाननी पुन्हा एकदा करावी लागेल. मी मुंबईत गेली की याबाबत बैठक घेणार आहे.आता तुम्ही म्हणाले लाडकी बहीण योजना आणली म्हणून द्राक्ष बागायतदारांना मजूर मिळत नाहीत. असं तुम्ही म्हणताय. मला हे कळत नाही, तुम्हाला मजूर मिळावे, म्हणून मी महिलांना पैसे द्यायचे नाही. च्यायला, हे काय आपल्याला पटत नाही, असे अजित पवार म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=qaibmzqyyle
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.