जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, अजित पवारांची बारामतीत पॉवरफुल खेळी


Jay Pawar Baramati Nagarparishad Election: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) हे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय पवार(Jay Pawar) हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, राजकीय वर्तुळात जय पवार यांच्या राजकीय एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.(Jay Pawar)

यापूर्वी अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा दणकून पराभव झाला होता. यानंतर अजित पवार यांचे दोन्ही पुत्र निवडणुकीच्या रिंगणातर उतरणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगत होत्या. विधानसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवार यांच्यासाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यातही जय पवार आघाडीवर होते. ते बारामतीच्या स्थानिक राजकारणात बरेच सक्रिय आहेत. त्यामुळे आता ते बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरुन आपल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु करण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेक जण इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊन धक्कातंत्र वापरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन रचनेनुसार या निवडणुकीत ४१ नगरसेवकांची निवड होणार असून, जर जय पवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अंतिम झाले, तर बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Jay Pawar Baramati Nagarparishad Election: जय पवार कोण आहेत?

जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचा ओढा उद्योग-व्यवसायाकडे अधिक आहे. काही काळ त्यांनी दुबईत व्यवसाय केला. सध्या मुंबईबारामती येथे ते व्यवसाय सांभाळत असल्याचे बोलले जाते. जय पवार जरी जास्त प्रमाणावर सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास हळूहळू सुरुवात केली होती.

सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेंविरोधात रिंगणात उडी घेतल्यावर जय पवार आईच्या प्रचारासाठी राजकीय मैदानात उतरले होते. पवार विरुद्ध पवार लढतीत जय पवारांनी आईची बाजू भक्कमपणे सांभाळून धरली. मोठे बंधू पार्थ पवार २०१९ मध्ये लोकसभेला उतरले असतानाही जय पवार प्रचारात उतरले होते. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यानंतर बारामतीतील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जय पवार यांनी कंबर कसली आणि तेही राजकारणात सक्रिय झाले आहे. राष्ट्रवादीच पडलेल्या फुटीनंतर जय पवार यांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.