अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढणार; उमेदवारी अर्जही भरला, नेमकं प्रकरण काय?

अजित पवार : पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक (Pimpri Chinchwad Election) अजित पवार (Ajit Pawar) देखील लढणार आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. प्रभाग क्रमांक 25 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज ही दाखल केलाय. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय…

पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून अजित पोपट पवार यांनी ‘ड’ जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर अर्ज भरल्यामुळे अनेकांना पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसलाय.  अजित पोपट पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. एबी फॉर्म मिळाल्यास ते शरद पवार–अजित पवार राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार असू शकतात.

Ajit Pawar : दोघांच्या नावात साधर्म्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे नाव राज्यात सर्वपरिचित आहे. त्यातच पिंपरी–चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 25 मधून अर्ज दाखल केलेले अजित पवार या दोघांच्या नावात साधर्म्य आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. या अनोख्या घटनेमुळे पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीत रंगत आणखी वाढली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad Election: पिंपरी–चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार

दरम्यान, पिंपरी–चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले असून, आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पिंपरी–चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र लढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी–चिंचवड येथे झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “पिंपरी–चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात होती. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर आणि व्यावहारिक निर्णय घेणे आवश्यक असते. त्यामुळे आमचे हे एकत्र येणे राज्याच्या हितासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

NCP Pune: अखेर ठरलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार; माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, कोण किती जागा लढणार?

आणखी वाचा

Comments are closed.