अकोल्यातल्या पातूरजवळ ऑटो आणि ट्रकमध्ये भीषण अपघात;दोघांचा जागीच मृत्यू, तर 4 प्रवासी गंभीर

अकोला अपघात बातम्या: अकोल्यातल्या पातूरजवळ भीषण अपघाताची घटना घडलीय. यात ऑटो आणि ट्रकमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर 4 प्रवासी गंभीर जखमी (Accident News) असल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातल्या पातुर बाळापूर (Patur-Balapur) रस्त्यावरील बाभूळगावजवळ हा अपघात झालाय.

पुढे आलेल्या माहितीनुसार, ट्रकने ऑटोला जबर धडक दिल्याने या अपघातात ऑटो रिक्षामधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. दरम्यान, ट्रकचालक हा घटनास्थळावरुन फरार झाला असून बाळापूर पोलीस त्याचा शोध घेत अधिक तपास करीत आहे.

दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, तर 4 प्रवासी गंभीर

दरम्यान, ट्रकची धडक इतकी भीषण होती की ऑटो पलटी होऊन प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेलेत. या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमावा लागलाय. प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं गेलंय. ऑटोमधील प्रवासी पियुष रविंद्र चतरकर (वय 13 रा.सिंधी कॅम्प,अकोला) आणि लिलाबाई ढोरे (वय 50 रा.लाखनवाडा) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे. तर सुरेंद्र चतरकर (वय 45), रविंद्र चतरकर (वय 52), रूपंचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय 65) हे गंभीर जखमी झाले.

पुण्यात बस चालकाने प्रवाशाला केली मारहाण; मारहणीचा वीडियो व्हायरल

पुण्यातील (Pune News) शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला.पुण्यात पीएमपीएमएलच्या मनपा ते तळेगाव ढमढेरे बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बस चालकाने शिक्रापूर चाकण चौकात बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना देखील अस्वस्थ असल्याचे काही प्रवाशांनी सांगितलं. या प्रकारामुळे पीएमपीएमएल चालकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

हे ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.