उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच! अकोल्यात भाजपच्या सरचिटणीसांचा राजीनामा
अकोला : राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी प्रारंभ आहे. अशातच उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच असल्याचे चित्र आहे. सिंगल सेले मिळवापान निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने पक्षात उद्रेक पाहायला मिळतोये. आता भाजपच्या (BJP) सरचिटणीसांनी थेट राजीनामा दिला आहे, तर माजी सभापतींनी तिकीट नाकारल्याप्रकरणी पक्षाला उत्तर मागितलेय.
गेल्या 30 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकाेला पश्चिम विधानसभामध्ये (Akola Municipal Corporation Election 2026) पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता तिथेचं निवडणुकीत पक्षाअंतर्गत खदखद वाढत आहे. तिकीट नाकारल्यामुळे भाजपचे सरचिटणीस रमेश अलकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तर त्यांनी पत्राद्वारे खंत व्यक्त केलीय. दरम्यान, दुसरीकडे अकोला महापालिकेचे माजी सभापती सतीष ढगे यांनी देखील पक्षाला तिकीट नाकारल्याचं उत्तर मागितलंये.
Akola BJP : कायमच निष्ठावंताना डावललं अन् आयारामांना पायघड्या; सरचिटणीसांनी पत्रातून व्यक्त केली खंत
गेले 3 टर्मपासून भाजपकडं नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलाय. प्रत्येकवेळी मला पुढील वेळी विचार करू, असे सांगत थांबण्याची सूचना दिल्या. अनेक नेतेमंडळींचा आदेश शिरसावंद्य म्हणून माझ्या इच्छुक उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. पक्षाने सांगितलेल्या उमेदवारांना व पॅनलला निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि प्रत्येक वेळी निवडून आणले. यावेळी मी प्रभाग 10 मध्ये उमेदवारीसाठी अर्ज दाखल करून मुलाखत दिली होती. पक्षाने यावेळेस माझा विचार करू असे, मला सांगितले. पण दरवेळेसप्रमाणे याही वेळी माझी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यासाठी कुठलेही पक्षाने मला ठोस कारण दिलेले नाही. एक कार्यकर्ता म्हणून मला हे कारण जाणून घेण्याचा निश्चितच अधिकार आहे.
पण कुठलेही सबळ कारण न देता किंवा काहीही न सांगता मला डावलण्यात आले. या सर्व प्रकारामुळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला व कायमच निष्ठावंताना डावलले गेले आणि आयारामांना पायघड्या घालण्याच्या प्रकाराला कंटाळून आजपासून पक्षाच्या संबंधित सर्व पदांचा राजीनामा देत आहे.
Akola News : पक्षाबद्दल मला कुठलाही आकस किंवा द्वेष नाही, पण…
भारतीय जनता पक्षाबद्दल मला कुठलाही आकस किंवा द्वेष नाही. आजही मनाने भारतीय जनता पक्षाचाच आहे, त्यामुळे मी कुठल्याही अन्य पक्षात जाऊन, जी सहज मिळू शकत होती ती उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज जरी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या राजकारणापायी सतत डावलले तरी प्रभागातील जनता मला बहुसंख्येने निवडून देईल, असा विश्वास त्यांनी पत्रातून व्यक्त केलाय.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.