पुण्यानंतर आता अकोला हादरलं; 60 वर्षीय वृद्धाचा दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आई-वडील कामा

अकोला: सध्या राज्यात नसरापूरच्या आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून (Akola Crime News) सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच प्रकारची संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन (Akola Crime News) अंतर्गत घडली आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका गावात एका 60 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार (Akola Crime News) केला आहे. पीडित चिमुकली आधी भीतीमुळे घरी सांगत नव्हती. मात्र, काल पीडित मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर यासंदर्भात चान्नी पोलिसांमध्ये (Akola Crime News) तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांची तीन पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.(Akola Crime News)

Akola Crime News: चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार

तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, आई वडील कामावरती गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धाने या चिमुकलीवर चार ते पाच दिवसांपासून वारंवार अत्याचार केला आहे. भीतीने चिमुरडी घरी सांगत नव्हती पण आई वडीलांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली, या घटनेनं परिसरात संतापाची लाट पसली आहे.

Pune Crime News:  पर्वती भागात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील पर्वती पायथ्याजवळील (Pune Parvati Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली. 70 वर्षीय आजोबाने सख्ख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नराधम आजोबावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Parvati Crime News) सदर प्रकरणी चिमुकलीवरील अनर्थ कसा टळला याबाबत माहिती समोर आली आहे. नातू आणि नात आरोपी आजोबाला भेटण्यासाठी आले होते. आरोपीने नातूला पैसे दिले आणि खाऊ खाऊन ये असं सांगितलं. नंतर आरोपीने नातीच्या अंगावरील कपडे काढले आणि स्वतःच्या अंगावरीलही कपडे काढले. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेलं आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. (Pune Parvati Crime News)

Pune Crime News:  नसरापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.