8 हजारांची लाच, पोलीस महिलेला ACB ने रंगेहाथ पकडले; नातवासमोर बेड्या ठोकताच रडू कोसळले
अकोला क्राईम न्यूज : अकोल्याच्या (Akola) पोलिस अधीक्षक कार्यालयात अमरावती एसीबीने लाचखोर महिला पोलीस क्लर्कवर कारवाई केली आहे. ममता पाटील असं लाचखोर महिला पोलीस क्लर्कचं नाव आहे. तक्रार फाईल पास करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी या ममता पाटील हिने तक्रारदाराकडं केली होती. दरम्यान, नातवासमोरच आजीला म्हणजे ममता पाटीलला लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. नातवासमोर अटक होत असताना लाचखोर महिलेच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, तक्रारीवरून पडताळणी केली असता ममता पाटील यांना लाच मागितल्याच सिद्ध झालं आहे. यानंतर ममता पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रार फाईल पास करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी
दरम्यान, तक्रार फाईल पास करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाचेची मागणी ममता पाटील हिने तक्रारदाराकडं केली होती. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने थेट अमरावती एसीबी कार्यालय गाठलं. या तक्रारीवरून पडताळणी केली असता ममता पाटील यांना लाच मागितल्याच सिद्ध झालं. त्यानंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाज घेताना या ममता पाटील महिला पोलीस क्लर्कला ताब्यात घेतले. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ या ठिकाणी काही काळ पाहायला मिळाला. नातवासमोरच आजीला (ममता पाटील) लाच घेतांना एसीबीने केली अटक. नातवासमोर अटक होत असताना लाचखोर महिलेच्या डोळ्यात अश्रू आले. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात ही घटना घडली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ
अकोल्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात अमरावती एसीबीने ही कारवाई केली आहे. पोलीस खात्यातील लाचखोर महिला क्लर्कवर कारवाई केली आहे. ममता पाटील असं लाचखोर महिला पोलीस क्लर्कचं नाव. ‘तक्रार फाईल’ पास करण्यासाठी तब्बल 8 हजार रुपयांची लाचेची मागणी या ममता पाटील हिने तक्रारदाराकडं केली होती. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने थेट अमरावती एसीबी कार्यालय गाठलं. या तक्रारीवरून पडताळणी केली असता ममता पाटील यांना लाच मागितल्याच सिद्ध झालं, त्यानंतर आज पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाज घेताना या ममता पाटील महिला पोलीस क्लर्कला ताब्यात घेतले. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालयातच ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ या ठिकाणी काही काळ पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
Pune Police : दोन कोटींची लाच मागितली, तक्रारदाराने 45 लाखांच्या खेळण्यातल्या खोट्या नोटा दिल्या; पुण्यातील PSI ला 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
आणखी वाचा
Comments are closed.