5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह; बायकोसोबत भांडण अन् सासरचा त्रास, कंटाळून तरुणाची रेल्वेखाली उडी; शे

अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्यातील पारसमध्ये एका विवाहीत व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे, त्या व्हिडिओद्वारे बायकोसह सासरच्यांनी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत मारहाण केल्याचं सांगत त्या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. संघपाल खंडारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीची नाव आहे. ऑटो ड्रायव्हर असलेला संघपाल बाळापूर तालूक्यातील पारसचा रहिवाशी आहे. त्याने आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यातूनच त्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली आहे.

आत्महत्यापूर्वी त्याने व्हिडिओमध्ये पत्नीसह सासरकडील 6 ते 7 लोकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप देखील केला आहे. आत्महत्यापूर्वीच त्याने हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये त्याने त्रास देणाऱ्यांची नावंही सांगितली आहेत, तर त्यांनी संघपालला कर्ज देखील काढायला लावलं असल्याचं त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये त्यानंतर तो सर्व नातेवाईकांना पाठवला आहे.  सासरच्या लोकांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत त्याने आयुष्य संपवलं आहे. व्हिडिओमधून आत्महत्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी त्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केली आहे. तसेच 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये पत्नी, सासूसह 3 महिला आणि एका पुरुषाचा अटकेत समावेश आहे. दरम्यान, संघपालने व्हिडिओमध्ये त्याच्यावर झालेल्या छळाची आपबिती सांगितली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

संघपालने आत्महत्या पूर्वी बनविलेला व्हिडिओ

संघपालने आत्महत्या पूर्वी बनविलेला व्हिडिओ 58 सेकंदाचा आहे, त्यामध्ये तो सांगतो की, दादा मी काय म्हणतो ते कान देऊन ऐक, त्याची आणि त्याच्या पत्नीची भांडणं झाली. त्यानंतर तिचा चुलत भाऊ, सख्खा भाऊ त्यांचे मित्र अशी मिळून चार ते पाच जणांनी मला बेदम मारलं, आणि मला आठ दिवसांपूर्वू त्यांनी तीन लाख रूपये कर्ज काढायला लावलं, ते मला जगू देत नाहीयेत. मला ते धमक्या देत आहेत. बायको, तिचा भाऊ, तिची आई, तिची बहिण, तिच्या भावाचे मित्र असे सहा ते सात जण आहेत. ते मला मारून टाकतील, त्याआधी मी माझा जीव देतो, मी मेल्यावर त्यांना सोडू नको. हा व्हिडीओ तू पोलिसांना दाखव आणि तिच्यावर केस कर, कसंही कर, जातो दादा, आई आणि बाबाला तू सांग, बाय बाय, असं संघपाल आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणतो आहे.

आणखी वाचा

Comments are closed.