तंबाखू खायला न दिल्याने सटकली, डोक्यात लोखंडी पाईप मारत एकाला संपवलं, अकोल्यात नववर्षाच्या सुरु
अकोला क्राईम न्यूज : अकोला (Akola) शहरात नववर्षाचे स्वागत सुरू असतानाच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील कृषीनगर (Krishinagar) परिसरात केवळ तंबाखू (Tobacco) खायला न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत संतोष भगवंतराव घावडे यांचा मृत्यू झाला आहे. तर राम कैलाश गिराम असे आरोपीचे नाव असून, त्याला अकोला पोलिसांनी (Akola Police) ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष घावडे आणि राम गिराम यांच्यात तंबाखूच्या कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरुवात झालेल्या या घटनेने काही वेळातच गंभीर वळण घेतले.
Akola Crime News: डोक्यात लोखंडी पाईप मारत संपवलं
वाद अधिक चिघळल्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. या दरम्यान आरोपी राम गिराम याने लोखंडी पाईपने संतोष घावडे यांच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संतोष घावडे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
Akola Crime News: आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी राम गिराम याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे कृषीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी अशा किरकोळ कारणांवरून घडणाऱ्या हिंसक घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस प्रशासनाकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.