सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; अकोला महापालिकेसाठी काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग
अकोला महानगरपालिका 2026 चे निकाल अकोला : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. तर बहूमतसाठी 41 चा आकडं गाठणं महत्वाचं आहे. त्यामुळे सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहे. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. पवित्रकार यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. ‘ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है’ म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेयेत. पवित्रकार हे भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहे.
दरम्यान, आपल्यावर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केलाय. आपला काही दोष नसतांना पक्षाने निलंबित केलंय. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने निलंबन मागे घेण्याचं आणि तिकीट देण्याचे आदेश दिल्यानंतरही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने आपल्याला जाणीवपूर्वक तिकीटापासून डावलल्याचा आरोप केलाय. त्यांचा रोख स्थानिक आमदार रणधीर सावरकर आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर आहे. या सर्व परिस्थितीत अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांची भूमिका काय?, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अकोला महानगरपालिका निकाल 2026 : अकोला महापालिकेसाठी भाजपचे सत्तेचे गणित
अकोल्यात भाजप 38 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलाय. तर काँग्रेसने 21 जागा जिंकत दुसरा मोठा पक्ष बनण्याचा मान मिळवलाय. दोन्ही पक्षांनी सत्तेचं समिकरण बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे 38 यासोबतच मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आलाय. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले आशिष पवित्रकार हे सुद्धा भाजपसोबत येऊ शकतात. यासोबतच अकोला विकास समितीचा विजयी झालेला 1 नगरसेवक यालासुद्धा भाजप सोबत घेण्याचा प्रयत्न करते आहेय. भाजपचे 38 आणि मित्रपक्ष शिंदे आणि अजित पवार यांसह 2 अपक्ष असे 42 चे संख्याबळ भाजप जमवू शकते.
अकोला महानगरपालिका निकाल 2026 : अकोला महापालिकेसाठी काँग्रेसचे सत्तेचे गणित
काँग्रेसचे 21 नगरसेवक विजयी झाले आहेत. यासोबतच ठाकरे गटाचे 6, शरद पवार गटाचे 3, वंचितचे 5, एमआयएमचे 3 यासोबतच काँग्रेस अजित पवारांचा 1 आणि आशिष पलित्रकारांसह दुसरा अपक्ष नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न करीत आहे. हा आकडा 41 होतो आहे. भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार यांना काँग्रेसकडून मोठ्या पदाची ऑफर देऊन त्यांना आपल्याकडे घेत आपल्याकडे घेत 41 चा आकडा गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहेय.
एकूण पक्षीय बलाबल
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाथा: ०६
शिंदे सेना : ०१
अजित राष्ट्रवादी : ०१
शरद राष्ट्रवादी : ०३
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
आणखी वाचा
Comments are closed.