अकोल्याच्या सत्ता समिकरणातल्या अंक गणिताचा सर्वात मोठा ‘अंक’; भाजपकडे 44 नगरसेवक असल्याचा दावा
अकोला महानगरपालिका 2026 चे निकाल : अकोल्याच्या सत्ता समिकरणातल्या अंक गणिताचा सर्वात मोठा ‘अंक’ आज अमरावतीत रंगणारेय. आज (27 जानेवारी) सकाळी 11 वाजतानंतर अमरावती (Amravati) विभागीय आयुक्त कार्यालयात अकोल्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील गटाची विभागीय आयुक्तांपुढे ओळख परेड होणारेय. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत बहुमताचा 41 हा आकडा कुणीच गाठू शकलं नाहीये. भाजपने (BJP) 38 तर काँग्रेसने 21 जागा जिकल्यायेत. दरम्यान, गट नोंदणीसाठी विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात भाजपने आपल्या गटात 44 नगरसेवक असल्याचा दावा केलाय. यात भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 असे 44 नगरसेवकांचा यात समावेश आहे.
दरम्यानभाजपच्या या दाव्यानंतर गेले दोन दिवस विरोधी आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित, एमआयएम आणि आशिष पवित्रकार या भाजप बंडखोर अपक्षाच्या अनेक बैठका पार पडल्यायेत. विरोधी आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांचा 1 नगरसेवक आणि अपक्ष चांद चौधरी या 6 नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न आणि मनधरणी करण्यात आलीये.
Akola Election 2026: आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात 44 नगरसेवकांचे समर्थन असल्याचा दावा
अशातचविरोधकांच्या या प्रयत्नांना भाजपसोबत आलेले हे 6 नगरसेवक कशा पद्धतीने प्रतिसाद देतात?, यावर अकोल्याची सत्ता ठरणारेय. भाजपने विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या पत्रात 44 नगरसेवकांचे समर्थन असल्याचा दावा केलाय. ‘शहर सुधार आघाडी’ असं या गटाला भाजपने नाव दिलंय. भाजपाचे पवन महल्ले यांची या गटाचे गटनेते म्हणून भाजपने निवड केलीये. भाजपच्या नेतृत्वात दावा केलेल्या 44 नगरसेवक खरंच आज विभागीय आयुक्तांपुढे हजर होतात का?, यावरच अकोल्याचं सत्ता समीकरण ठरणारेय.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Akola Municipal Corporation Election 2026)
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाथा: ०६
शिंदे सेना : ०१
अजित राष्ट्रवादी : ०१
शरद राष्ट्रवादी : ०३
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
BJP vs Cobgress :भाजप आणि काँग्रेसकडून राजकीय जोडतोडीसाठी निकराचे प्रयत्न
महापालिकेच्या निकालानंतर आता अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ रंगतंये. या सत्तेच्या खेळात अकोल्यात प्रत्येक नगरसेवक आणि अगदी छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्व आलंये. अकोल्यात भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 नगरसेवक विजयी झालाये. तर दोन अपक्ष विजयी झालेयेत. यात आशिष पवित्रकार हा भाजपचा बंडखोर अपक्ष आहेय. तर दुसरा अपक्ष हा भाजपने पुरस्कृत केलेले चांद भोजा चौधरी आहेय. त्यामूळे भाजपने आपण सहज महापालिकवर सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केलाय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.