अकोट नगरपालिकेत सर्वाधिक चर्चेत उमेदवार खोट्या शपथपत्रामुळे अडचणीत, चौथं आपत्य लपवलं; शपथपत्राच
Akola: संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोट नगरपालिकेसाठी एमआयएमच्या उमेदवार असलेल्या फिरोजा बी शरीफ राणा या त्यांनी उनेदवारीसोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. उमेदवारी दाखल करताना त्यांनी खोटं प्रतिज्ञापत्र भरल्याची बाब समोर आलीय. 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असलेल्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुकीत उभे राहता येत नाहीय. मात्र, फिरोजाबी यांचं चौथं अपत्य असलेली मुलगी निखत अंजुम यांचा जन्म 28 फेब्रुवारी 2002 रोजी झाल्याची बाब समोर आलीय. या संदर्भातले महत्त्वाचे कागदपत्र ‘एबीपी माझा’च्या हाती आलेयेत.
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेची निवडणूक जिल्ह्यात औत्सुक्याचा विषय आहे. अकोटमध्ये सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचलीय. अकोट नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या उमेदवारांपैकी एक नाव आहेय फिरोजाबी शरीफ राणा यांचे… त्या अकोट नगराध्यक्षपदासाठी एमआयएमच्या उमेदवार आहेत. मात्र, याच फिरोजाबी आता उमेदवारीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रावरून अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जातीय.
शपथपत्रात चौथं आपत्य लपवलं ..
फिरोजा बी यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात एकदा दोन अपत्य असल्याच उल्लेख केलाय. तर एकदा तीन अपत्य असल्याचा सांगितलंय. मात्र, त्यांनी या संदर्भात चौथं अपत्य लपवल्याची बाब शपथपत्रावरून समोर आलीये. मात्र, फिरोजाबी यांचं चौथं अपत्य असलेली मुलगी निखत अंजुम यांचा जन्म 28 फेब्रुवारी 2002 रोजी झाल्याची बाब समोर आलीय. असं तक्रारदार मौलाना हाफीज उमर, अकोट, जि. – अकोला. यांनी सांगितलं.
यासंदर्भात ‘एबीपी माझा’ने निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांच्याशी संपर्क केलाय. त्यांनी फिरोजाबी यांच्या अर्जवर कोणत्याही उमेदवाराने आक्षेप घेतला नसल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलंय. तर उमेदवार फिरोजाबी यांनी यासंदर्भात ‘इन कॅमेरा’ काहीही बोलायला नकार दिलाय. हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे त्या म्हणाल्यात.
निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्राची सत्यता वेळीच तपासणारी कोणतीच यंत्रणा निवडणूक आयोगाकडे नाहीय. अकोटच्या एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी यांच्या उमेदवारी अर्जातील अपत्याबाबतच्या खोट्या माहितीची आता निवडणूक आयोग कशी दखल घेतो?, हे पाहणं औत्सुत्याचं ठरणार आहेय.
आणखी वाचा
Comments are closed.