अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला बातम्या : अकोला महापालिकेत ( Akola Municipal Corporation) महापौर-उपमहापौर पदानंतर भाजपने (BJP) स्थायी समिती आणि इतर समित्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आज झालेल्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलु पैलवान यांचा 9 विरुद्ध 6 मतांनी पराभव केला आहे. 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजप आणि मित्र पक्षांचे 9 सदस्य आहेत. तर विरोधी पक्षांचे 7 सदस्य आहेत. आजच्या निवडणुकीत एमआयएमचा एक सदस्य तटस्थ राहिला आहे.
अकोला महापालिकेवर भाजपाच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले
याशिवाय महिला आणि बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या आरती घोगलिया यांची अविरोध निवड झाली आहे. तर चार झोन समित्यांच्या सभापती पदांपैकी दोन वर भाजप, एकवर मित्रपक्ष असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी तर एका झोन समितीवर काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पूर्व दोनच्या सभापती पदी भाजपच्या रश्मी अवचार, पश्चिम झोन सभापतीपदी भाजपचे राजेश्वर धोटे, उत्तर झोन सभापतीपदी काँग्रेसच्या जैनब्बी शेख इब्राहिम तर दक्षिण झोनच्या सभापतीपदी महापालिकेत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पूजा गावंडे यांची निवड झाली आहे. या सर्व निवडींनी अकोला महापालिकेवर भाजपाच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील या आघाडीत भाजपसह दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे यांची शिवसेना आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकरांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 नगरसेवकांच्या साथीने 38 नगरसेवकांसह काठावरचे बहुमत असलेल्या भाजपने विजय मिळवला आहे. खेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेखा काळे यांचा पराभव केला आहे. अकोला महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना सत्तेसाठी केवळ 3 जागांची गरज होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने 41 चा आकडा पार केला. पण यात भाजपला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही साथ दिली. त्यानंतर भाजपने 44 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करीत बहुमताचा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत भाजपने 38, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, वंचित बहुजन आघाडी 5, एमआयएम 3, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1,आणि अपक्ष 3 अशा जागा जिंकल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.