धक्कादायक! तरुणीचा जळालेला मृतदेह आढळला, अकोल्यातील बाळापूर तालुक्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी


अकोला बातम्या : अकोला (Akola) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात आज संध्याकाळच्या सुमारास भीषण प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस पाटील प्रमोद लांडे यांच्या शेताच्या लगत सुमारे 30 ते 32 वर्षीय अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. युवतीच्या अंगावर एकही कपडा नसल्यामुळे आणि परिसर निर्जन असल्याने, ही युवती इतरत्र ठार करुन येथे आणून टाकण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

माहिती मिळताच बाळापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस (Balapur Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही, तर या प्रकरणाचा तपास बाळापूर पोलीस करत आहे. दरम्यान, धनेगाव शेतशिवारात तरुणीचा जळालेला मृतदेङ आठळल्याने परिसरात एकच खळबळ फडाली आहे. ही नेमकी हत्या आहे की आणखी काही याचा तपास पोलीस करत आहेत.

जालन्यात 45 वर्षीय व्यक्तीची हत्या, परिसरात कळबळ

जालना (जालना) शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नूतन वसाहत (Nutan vasahat)  भागात एका 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करुन खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब सोमधाने असं मृत्यू झालेल्या वक्तीचे नाव आहे. बाबासाहेब सोमधाने हे भाजीपाला घेत असताना चारचाकी वाहनात आलेल्या तीन जणांकडून भर बाजारात तलवारीने त्यांच्या हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी तीन संशयितांोना घेतलं ताब्यात, चौकशी सुरु

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. जुना वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून हा वाद झाल्याने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं हत्या करण्याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, अचानक चारचाकी गाडीतून तीन जणांना येऊन बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तलावारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेमुळं जालना शहरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

ताम्हिणी घाट अपघात, दरीत कोसळलेल्या ‘थार’मधील सर्व पुण्याचे; 19 ते 22 वर्षाचे पर्यटक युवक ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

आणखी वाचा

Comments are closed.