Akola News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद! अकोला वन विभागाच्या पथकाला यश

बातमीचे वर्णन केले गेले आहे: अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर पिंजऱ्यात कैद झालाय. अकोला वन विभागाच्या (Forest Department) पथकाने रेस्क्यू करत या बिबट्याला पिंजराबंद केलंय. अकोल्यातल्या (Akola) बाळापूर शेताशिवारात एक बिबट्या असण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून होती. या बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून परिसरातील काही बकऱ्या आणि गाईची शिकार केली होती.  त्यानंतर शेतकर्‍यांमध्ये भीतीच वातावरण होतं.

अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद!

अखेर वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली, मात्र बिबट्याचा शोध काही केल्या लागत नव्हता. अखेर गावकऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये बिबट्या फसला. वन विभागाला याची माहिती देण्यात आली असता अकोला वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बिबट्याला सुखरूप रेस्क्यू करत पिंजऱ्यात कैद केले आहे.

परिसरात आणखी बिबट असल्याची शक्यता

पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुखरूप पणे जंगलात सोडून देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून बाळापूर शेतशिवाराच्या परिसरात वावरत होता. या बिबट्याने शेतकऱ्यांच्या जनावरांची देखील शिकार केली होती. अखेर आज बाळापुर न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या एका शेतात बिबट्या हा लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकलाय. हा बिबट्या जवळपास दीड वर्षाचा असून नर आहे. विशेष म्हणजे या परिसरात आणखी बिबट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या रात्रभर गावकऱ्यांनी लावलेल्या एका ट्रॅपमध्ये अडकलेला होता. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतमजुरांना हा बिबट्या दिसून आला होता.

एमआयडीसीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ

अकोल्यातल्या एमआयडीसीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एमआयडीसी मधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये चार अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये चोरी केली. हा संपूर्ण प्रकार एमआयडीसीतील कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. विशेष म्हणजे या चोरट्याने चार कंपनीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. ऑटोमोबाईलच्या एका कंपनीमधून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा रोख लंपास केलाय. तर उर्वरित तीन कंपन्यामधून चोरट्यांना चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र येथे चोरट्यांचा डाव फसला. दोन चोरटे कंपनीच्या भिंतीवरून उडी मारत कंपनीमध्ये शिरतात आणि टेबलच्या कॅश काऊंटर उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु कॅश काउंटर तोडता न आल्याने कंपनीतील जनरेटर बॅटरी सह इतर काही साहित्य सोबत पळवून नेलंय.

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, आता अकोला पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं ठाकलंय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.