एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून एमआयएमच्या उमेदवाराचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा
केले: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांना हालचाली सुरु केल्या आहेत. आज उमेदवाराी अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. काही जणांना उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत, तर काही जणांनी बंडखोरी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमच्या मुस्लिम उमेदवाराने शरद पवारांच्या मुस्लिम उमेदवारासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून मशिदीत ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली होती. या ईश्वरचिठ्ठीत ज्या उमेदवाराचे नाव निघेल, त्या उमेदवाराने महापालिका निवडणुकीतून अर्ज माघारी घ्यायचा असे ठरले होते. त्याप्रमाणे एमआयएमच्या उमेदवाराने माघार घेत शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मुस्लिम समाजाची बैठक
आज महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आपल्या विरोधातील उमेदवाराचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येकाने आपली ताकद लावली. काही ठिकाणी धमक्या, दबाव आश्वासनं देण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी पैशाचेही व्यवहार झाल्याची चर्चा आहे. मात्र, अकोल्यातील प्रभाग क्रमांक 16 मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील शमीम बी शेख रफीक या एमआयएमच्या महिला उमेदवाराच्या माघारीची इनसाईड स्टोरी आणि एक्सक्लूझिव्ह व्हिडिओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. या जागेवर एमआयएम कडून जमीन बी शेख रफिक या उमेदवार होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमरीन सदाफ सय्यद नाजीम उमेदवार होत्या. या दोघीही मुस्लिम समाजातून असल्याने त्यांच्यातील मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मुस्लिम समाजाची एक बैठक झाली. अकोल्यातील खदान भागातील एका मशिदीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना बोलवण्यात आलं. यावेळी ईश्वरचिट्टीत ज्याचं नाव निघेल त्याला माघार घ्यावी लागेल असा निर्णय झाला. ईश्वर चिठ्ठीत एमआयएमच्या उमेदवार शमीम बी शेख रफिक यांचं नाव निघालं. त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक 16 मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातून आपलं नामांकन अर्ज परत घेतला.
आता या ठिकाणी त्यांनी शरद पवार गटाच्या अमरीन सदाफ सय्यद नाजीम यांना पाठिंबा दिला आहे. राजकारणातील धार्मिक धृवीकरणासाठीच्या अकोल्यातील या प्रकारावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
Latur BJP Crisis : “आम्हीच खरे भाजपवाले” लातूरमधील भाजपचे 28 बंडखोर ठाम; निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार कायम..
आणखी वाचा
Comments are closed.