एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर ‘महाराष्ट्र’ सिनेमात पहिला सीन कोणता असेल? मुख्यमंत्री म्हणाले…


अक्षय कुमार मुलाखत घेतलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस: बॉलिवूडचा (Bollywood News) खिलाडी कुमार अक्षय कुमारनं (Akshay Kumar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. ‘महाराष्ट्र आणि सिनेमा – भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य’ घडवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.  यावेळी अक्षय कुमारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जर तुम्ही एका दिवसासाठी दिग्दर्शक झालात तर, पहिला सीन काय शूट कराल? असा प्रश्न विचारलं. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावणारं उत्तर दिलं. नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत? सविस्तर पाहूयात…

अभिनेता अक्षय कुमारनं देवेंद्र फडणवीसांना विचारलं की, असा कोणता सिनेमा आहे, ज्यांनं तुम्हाला राजकीय दृष्टीकोनातून भूरळ घातलीय…? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पाहा ज्यावेळी तुम्हाला सिनेमा भूरळ घालतो किंवा काही शिकवतो, ते आपल्या संवेदना आणि मनाला प्रभावितकरतो… तसं अनेक फिल्म्सनी मला प्रभाविक केलीय… पण, जर राजकारणाविषयी बोलायचं झालं तर, एक फिल्म आहे, ज्याचा मी इथे नक्कीच उल्लेख करिन, त्या फिल्मनं मला प्रभावित केलंच, पण त्या फिल्मनं माझ्यासाठी एवढ्या समस्या वाढवल्या… ती फिल्म आहे, ‘नायक’… या फिल्ममध्ये अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात एवढी कामं करतात की, मी जिथे कुठे जातो, तिथे लोक मला सांगतात की, ‘नायक’ सारखं काम करा… एका दिवसात त्यांनी किती काय-काय केलं… कसं एकाच दिवसांत त्यांनी सगळंच बदललं…

“मला एक दिवस अनिल कपूर भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुम्हा का बनवलीय नायक? तुम्ही ‘नायक’ आणि आम्ही ‘नालायक’… एकाच दिवसांत तु्म्ही एवढ्या गोष्टी कशा केल्या? मला असं वाटतं की, एक बेंचमार्क सेट करण्याचं काम त्यांनी केलंय… पण चित्रपटांनी, एक माणूस म्हणून माझ्या संवेदना जागृत केल्यात. अनेकदा असं होतं की, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही एखादं काम सारखं-सारखं केलं की, तुमचे इमोशन्स थोडे कमी होतात… पण ते इमोशन्स जिवंत ठेवण्याचं काम फिल्म्सनी केलंय… मी असं मानतो की, फिल्म पाहिल्यानंतर मी एक सर्वसामान्य माणूस बनतो… जो मी कित्येक वर्षांपासून आहे…”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर… देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अक्षय कुमारं विचारलं की, नायक फिल्ममध्ये जसं अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनतात, तसं जर तुम्हाला एक दिवसासाठी दिग्दर्शक बनवलं आणि फिल्मचं नाव महाराष्ट्र असेल, तर तुम्ही पहिला सीन काय दिग्दर्शित कराल? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जर महाराष्ट्रावर फिल्म बनत असेल तर, पहिला सीन असेल छत्रपती शिवाजी महाराज… राज्याभिषेकासाठी सिंहासनावर आरुढ झाले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचा निर्माण हाच त्या सिनेमाचा पहिला सीन असेल…”

पाहा व्हिडीओ : CM Devendra Fadnavis Interview | अक्षय कुमारचे प्रश्न, मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास उत्तरे

https://www.youtube.com/watch?v=i37dqvd7kru

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Devendra Fadnavis & Akshay Kumar: मोदींना विचारलं आंबा कसा खाता? ट्रोल होऊनही अक्षय कुमारने फडणवीसांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.