शेकापच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांनी डाव टाकला, अलिबाग नगराध्यक्षपदासाठी तरुण चेहरा मैदानात उत
अलिबाग निवडणूक 2025: रायगड (Raigad) जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीची (Alibaug Nagar Palika Election) रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. यंदा नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण असल्याने अनेक महिला या पदासाठी इच्छुक होत्या. मात्र, अलिबाग नगरपालिकेवर गेल्या वीस वर्षांहून अधिक काळापासून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांचं एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही शेकापचं बळ टिकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शेकापकडून अखेर नगराध्यक्ष पदासाठी अक्षया प्रशांत नाईक (Akshaya Prashant Naik) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा केली.
Akshaya Naik: अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर
त्यामुळे शेकापसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना किती जागा मिळतात, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नसल्याने शेकाप विरुद्ध शिंदे सेना असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.अक्षया नाईक यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या वडिलांच्या कार्याचा फायदा होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर दुसरीकडे नव्या पिढीतील महिला नेतृत्व म्हणून अक्षया नाईक यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा अलिबागमध्ये रंगली आहे.
Pen Nagar Parishad: पेण नगरपरिषद: भाजपच्या बालेकिल्ल्यात चुरशीची लढत
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यात पेण नगरपरिषदेचाही समावेश आहे. या नगरपालिकेत बारा प्रभागांमधील एकूण 24 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा एकूण 25 जागांसाठी यावेळेस चुरशीची लढत रंगणार आहे. मनसेने स्वबळावर सर्व 25 जागा लढवण्याचा नारा दिला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील “आम्हीदेखील जोरदार उतरणार” असा नारा दिला आहे. हा परिसर विद्यमान भाजप आमदार रवी पाटील आणि भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्याला यावेळी कोण सुरंग लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेकापची देखील या बालेकिल्ल्यात जुनी ताकद असल्याने शेकाप देखील काही संभाव्य जागांवर महाविकास आघाडीतून जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पेणमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.