रात्री पुण्याची युती फिस्कटली पण पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र यायचं का? अजित पवार अन् अमोल कोल्हेंच
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडीची चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. कारण अजित पवारांनी (Ajit Pawar NCP) शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या तीस ते पस्तीस जागा देऊ केल्या आहे आणि घड्याळ या चिन्हावर लढण्याची अट घातली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल (शुक्रवारी, ता २६) रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही. अशातच आज सकाळच्या सुमारास पुण्यातील अजित पवारांच्या (Ajit Pawar) जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) दाखल झाले, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: कोल्हे आणि अजित पवारांच्यात कशावर चर्चा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीत बिघाडीची चिन्ह निर्माण झाली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविआ वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का? या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या आज सकाळी सकाळी झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे. घडाळ्याचा चिन्हावर लढा, असा प्रस्ताव पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांनी दिला नसल्यानं चर्चा पुढच्या टप्प्यात येऊन पोहचली असल्याची माहिती आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसने आम्ही या आघाडीत येणार नाही, असा निरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काल रात्री दिला आहे. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये मविआ वगळता फक्त दोन राष्ट्रवादी एकत्र यावं का? अशी चर्चा अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात आजच्या गुप्त बैठकीत झाल्याची माहिती आहे. तसेच ज्या दोन जागांवर तिढा होता, तो सोडवण्याची तयारी ही अजित पवारांनी दाखवली आहे. किमान पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं, त्यामुळं तडजोड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika: बारामतीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे गौतम अदानींसोबत कार्यक्रमासाठी एकत्र
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे आघाडी बाबत वेगवान घडामोडी होत असताना उद्या बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत. यावेळी तिघांमधे दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोडींबाबत चर्चा होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमधील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या इमारतीचे उद्घाटन गौतम यांच्या मार्फत होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.