मी हरमनप्रीत कौर का? मारहाणीच्या आरोपावर बांगलादेशी कर्णधाराचे वादग्रस्त वक्तव्य, नेमकं काय म्ह
निगार सुलताना : बांगलादेश महिला संघाची कर्णधार निगार सुल्ताना ही तिच्या खेळापेक्षा तिच्या कृतींमुळे जास्त चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्यावर स्वतःच्या संघातील खेळाडूंशी मारहाण केल्याचे गंभीर आरोप झाले होते. या आरोपांवर उत्तर देताना निगार सुल्ताना हिने भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचं नाव घेतले आणि त्यावरून आता मोठी खळबळ उडाली.
निगार सुल्तानाचं स्पष्टीकरण काय? (What did Nigar Sultana say?)
निगार सुल्ताना म्हणाली की, “मी कोणाला का मारू? मी स्टंप्सवर का मारू? मी हरमनप्रीत कौर आहे का? मी असं का करू?” यापुढे ती म्हणाली, “मी कधी कोणाशी भांडण केले आहे का, हे तुम्ही कोणत्याही खेळाडूला विचारून पाहा.” परंतु या वक्तव्यामुळे प्रश्न निर्माण झाला की निगार सुल्तानांनी नेमकं हरमनप्रीत कौरचे नाव का घेतले?
हरमनप्रीत कौरने नेमके काय केले होते? (What exactly did Harmanpreet Kaur do?)
2023 मध्ये भारताच्या महिला संघाचा बांगलादेश दौरा झाला होता. त्या मालिकेत एक वादग्रस्त प्रसंग घडला. वनडे सामन्यात हरमनप्रीत कौर एलबीडब्ल्यू दिल्यावर संतापली आणि तिने थेट स्टंप्सवर बॅट मारली. अंपायरकडेही तिने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. सामना भारत हरला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. याच दरम्यान हरमनप्रीत हिने बांगलादेशी चाहत्यांकडे अंगठा दाखवत प्रतिक्रिया दिली होती. या सर्व प्रकारानंतर तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आला होती.
हरमनप्रीत कौरने रचला इतिहास (Harmanpreet Kaur created history won ICC Women’s World Cup title)
जरी बांगलादेशी महिला संघाची कर्णधार निगार सुल्ताना हिने तिच्यावर टीका केली असली तरी हरमनप्रीत कौरने भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून हा ऐतिहासिक विजय मिळवला. ही संपूर्ण घटना निगार सुल्तानच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली असली तरी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली ऐतिहासिक कामगिरी आजही तितकीच दिमाखात उभी आहे.
🚨बांगलादेश महिला संघाची कर्णधार निगार सुलतानाने अखेर ज्युनियर खेळाडूंवर शारीरिक अत्याचार केल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले – आणि स्वतःचा बचाव करताना तिने हरमनप्रीत कौरलाही वादात ओढले.
निगार म्हणाला:
मी कुणाला का मारेन? मी हरमनप्रीत कौर आहे का… pic.twitter.com/1czYtOp8Vy— राकेश चौधरी (@realRakesh0) 18 नोव्हेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.