Amarnath Yatra Security alert अमरनाथ यात्रेकरता सुरक्षा अलर्ट जारी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट, :भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून इशारा
►वृत्तसंस्था जम्मू
आगामी अमरनाथ यात्रेवरून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात बिघडलेल्या स्थितीपासून लक्ष भटकविण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचू शकते असे म्हटले गेले आहे.
यंदा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून
पाकिस्तानसाठी सध्या पीओके, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. खासकरून पीओकेत जारी निदर्शनांमुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. अलिकडेच अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून करण्यात आलेले हवाई हल्ले देखील अंतर्गत दबावावरून लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा होता असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
यात्रेला लक्ष्य करण्याची भीती
इंटरसेप्ट करण्यात आलेल्या काही इनपूटमधून पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट रचत असल्याचे संकेत मिळाले आहेत. याकरता आयएसआय जम्मू-काश्मीरच्या जंगलांमध्ये लपलेल्या काही दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दहशतवाद्यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेदरम्यान हल्ला करण्याचा कट रचला जाऊ शकतो असे गुप्तचर यंत्रणांचे मानणे आहे. या दहशतवाद्यांना पहलगामसारखा मोठा हल्ला करण्याचा निर्देश देत असल्याचे समोर आले आहे.
कडेकोट बंदोबस्त
संभाव्य धोका पाहता सुरक्षा यंत्रणांनी अमरनाथ यात्रामार्गावर व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पूर्ण मार्गावर दहशतवादविरोधी व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित कॅमेरे आणि अत्याधुनिक डिजिटल स्कॅनिंग सिस्टीमही तैनात करण्यात आली असून याच्या माध्यमातून संशयास्पद हालचाली त्वरित टिपण्यात येणार आहेत.
मॉड्यूल सक्रीय करण्याचा प्रयत्न
आयएसआय मागील काही काळापासून पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्वत:च्या मॉड्यूलला पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात लवकर मोठी दहशतवादी घटना घडावी, जेणेकरून पीओके आणि इतर क्षेत्रांमधील बंडसदृश स्थितीवरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
पाकिस्तानवर दबाव
पीओकेत जारी निदर्शनांमुळे पाकिस्तानसाठी अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. तेथील लोक पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची मागणी करत आहेत. पाकिस्तानातही पीओकेतील स्थितीवरून सवाल उपस्थित केले जात आहे, यामुळे तेथील सरकार आणि सैन्यावरील दबाव वाढत चालला आहे.
Comments are closed.