नवलच! हरवलेली नदी?
<<अरूण>>
एक मित्र वीसेक वर्षांपूर्वी केंब्रिज विद्यापीठात शिकत होता. सुट्टीला घरी यायचा. भरपूर गप्पा व्हायच्या. त्यात एकदा कचरा-घाणीने ‘बुजत’ चाललेल्या मिठी नदीचा विषय निघाला आणि तो पटकन म्हणाला, “अरे, लंडनमध्येसुद्धा एका नदीचं असंच झालंय. पूर्वी जिथे ‘फ्लीट’ नदी होती, तिथे आता फ्लीट स्ट्रीट आहे.’’
या गोष्टीची आठवण होण्याचं कारण म्हणजे, आज 7 जूनला महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा आहे. ‘एल निनो’ वगैरे संकटांवर मात करीत पाऊस बऱयापैकी पडला तर राज्यातल्या अनेक मोठय़ा नद्या आणि उन्हाळय़ात केवळ नकाशावर नाव उरणाऱया नद्याही दुथडी भरून वाहू लागतील. शेतकरी आनंदून जाईल. निसर्गचक्राच्या लहरीचं सांगता येत नाही, पण चांगल्याची अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे?
आता लंडनमध्ये एकेकाळी वाहणाऱया ‘रोमन वाटर वे’ गणल्या जाणाऱया लंडन शहराच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा ठरलेल्या ‘फ्लीट’ नदीला ‘लास्ट रिव्हर’ किंवा हरवलेली नदी म्हणतात. कशी हरवली ही अख्खीच्या अख्खी नदी? कारण असं दिलं जातं की, लंडन शहराची लोकसंख्या व्हिक्टोरियन काळाच्या आधीच वाढायला सुरुवात झाली होती. 1730 मध्ये लंडन ‘पाश’ नव्हे, तर गलिच्छ शहर बनलं होतं. नद्या घाण-कचऱयामुळे कमालीच्या प्रदूषित होऊन आसपास दुर्गंधी पसरत होती. त्यातच कालऱयासारख्या जीवघेण्या साथी. मग तत्कालीन ब्रिटिश राजवटीने निर्णय घेतला की, गटारात रूपांतर झालेली ही नदी बुजवायची! तशी ती बुजवली, पण पाणी प्रवाही असतंच ते जाणार कुठे? त्यासाठी भूगर्भातील पाइपातून ते वाहून जाण्याची ‘ड्रेनेज’ व्यवस्था निर्माण करण्यात आली.
परिणामी, एकेकाळी भूपृष्ठावर रम्य किनारे असलेली ‘फ्लीट’ लुप्त होऊन ‘गटारी’ स्वरूपात भूमिगत होऊन वाहू लागली. 1870 पर्यंत ‘फ्लीट’चे मूळ रूप हरवून गेले. आताही ही नदी वाहते. नाही असं नाही, पण हेमप्स्टीड हीथ, किंग्ज क्रास, ब्लाकफ्रायर्स ब्रीज अशी जमिनीखालून! प्रदूषण आणि कचऱयामुळे एखाद्या नदीचाच जीव जाण्याची ही ऐतिहासिक घटना असेल.
आपल्याकडेही ‘सरस्वती’ नदी लुप्त झाली असं म्हटलं जातं, परंतु तो काळ मानवनिर्मित प्रदूषकांच्या कितीतरी आधीचा आहे. ‘सरस्वती’चं लुप्त होणं हा नैसर्गिक आविष्काराचा परिणाम आहे, पण ‘फ्लीट’ लुप्त झाली ती मात्र माणसाच्या अत्याधुनिकतेचं बायप्राडक्ट किंवा ‘उपपदार्थ’ झालेल्या प्रदूषणापायी.
मुंबईतली ‘मिठी’सुद्धा एकेकाळी स्वच्छ जलप्रवाहच होती. 1960 च्या दशकातल्या एखाद्या फोटोत तो प्रवाह दिसतो, पण आता असं आहे खरं! दुर्भाग्य एकेका नदीचं. दुसरं काय?
. निषिद्ध सज्जना राघवी वस्तीचे जे.
समर्थ रामदास ‘मनोबोधात’ सांगत आहेत की, हे मना! तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. श्रीरामरायाची अवज्ञा होईल असे कोणतेही चुकीचे कार्य तू करू नको. हे सज्जन मना, तू राघवापाशीच वास्तव्य कर. नीतिने वागणाऱयांकडे, सदाचाराचे पालन करणाऱयांकडे, रघुराजा थक्क होऊन कौतुकाने पाहतो. तू ही अशी भक्ती कर की राघवाने थक्क व्हावे. कसे असतात हे सत्पुरुष? ही सदाचारी माणसं? ज्ञानदेव नीति संपन्न सत्पुरुषाचे जीवनकार्य विशद करताना म्हणतात… ‘जो अंतरी दृढु। परमात्मा रुपी गुढु। बाह्य तरी रुढु। लौकिकू जैसा। तो इंद्रिया अज्ञा न करी। विषयांचे भय न धरी। प्राप्त कर्म न अव्हेरी।’ सदाचरणाचे पालन करणारा सत्पुरुष कसा? तर जो मनामध्ये दृढ संकल्प करतो. तो सदाचरणी इंद्रियांना आज्ञा करीत नाहीच पण त्याला विषयांचे भयही वाटत नाही. कर्मेंद्रिय आपापली कर्म करीत असली तर तो त्यांचे नियमन करीत नाही पण त्यामुळे निर्माण होणाऱया विकारांनीही तो झाकला जात नाही. जसे कमल पत्र पाण्यामध्ये असून देखील पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, त्याप्रमाणे तो कामनांमध्ये गुरफटत नाही म्हणून मोहरूपी मळाने तो बरबटत नाही. प्रभू श्रीरामचंद्र या सर्व गुणांनी युक्त आहेत. असे गुण असलेल्या सत्पुरुषांचे स्मरण म्हणजे देखील ईश्वराचे सन्निध वास्तव असल्यासारखेच आहे.
संध्या शहापुरे
मना प्रार्थना तुजला येक आहे।
रघुराज थक्कीत होऊनी पाहे।
अवज्ञा कधी हो यदर्थी न कीजे।
निषिद्ध सज्जना राघवी वस्तीचे जे.
Comments are closed.