‘राजा शिवाजी’ चित्रपट टॅक्स फ्री करा, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त (टॅक्स फ्री) करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
अंबादास दानवे यांनी पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. महाराजांचा पराक्रम, लोककल्याणकारी दृष्टिकोन, प्रशासन कौशल्य, गनिमी काव्याची रणनीती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसमोर सशक्तपणे उभे राहणार आहे. त्याचप्रमाणे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासही हा चित्रपट उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे चित्रपट समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा तसेच विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला तो सहज उपलब्ध व्हावा, यासाठी सदर चित्रपटास शासनाकडून करमुक्ती देणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
Comments are closed.