शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत

अंबरनाथ बातम्या : भाजप नगरसेवकांना शिवसेनेच्या माजी आमदारांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने पाठवलेल्या प्रतिकात्मके गुढ्या आणि शुभेच्छा पत्र अंबरनाथ भाजप नगरसेवकांनी परत पाठवल्या आहे. याचे कारण म्हणजे, (शुक्रवारी 13 मार्च रोजी) अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शिवसेनेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे शिवसेनेने बहुमताने मंजूर करून घेतली, मात्र भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे बहुमताच्या जोरावर नामंजूर केली, असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. तर शिवसेनेने सर्वसाधारण सभेत खेळलेली ही खेळी भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. त्याच निमित्ताने आता हा अंतर्गत वाद (भाजप विरुद्ध शिवसेना)चव्हाट्यावर आला असून याच रागातून भाजप नगरसेवकांना शिवसेनेच्या माजी आमदाराद्वारे पाठवलेल्या गुढी परत पाठवल्याची चर्चा आहे. (अंबरनाथ भाजपा विरुद्ध शिवसेना)

Ambernath BJP vs Shivsena : आम्हाला विकास कामांची गुढी हवी होती, पण

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी अंबरनाथ मधील भाजपच्या सर्वच नगरसेवकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा पत्र आणि प्रतिकात्मक गुढ्या भेट म्हणून पाठवल्या. मात्र आम्हाला विकास कामांची गुढी हवी होती, व्हीजनमॅन म्हणून ओळख असलेले खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नगरसेवकांनी सभागृहात भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना नव्हे तर नागरिकांच्या विकासकामांना विरोध केला. अशी टीका भाजपच्या नगरसेविका अनिता भोईर आणि सुजाता भोईर यांनी शिवसेनेवर केली.

एकनाथ शिंदे : अभिनेत्री विशाखा सुभेदाraanni घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा नुकताच कुवैतहून भारतात सुखरूपपणे परतला. यानंतर आज या माय लेकानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी मी फक्त कर्तव्य भावनेतून मदत केली असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले. तसेच  सुखरूपपणे मायदेशी परतल्यानंतर अभिनयची  विचारपूस करून त्याला भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार हेदेखील उपस्थित होते.

Ambadas Danve  : शिवसेना नेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन, फोनवरून केली शिवीगाळ

शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी धमक्यांचे फोन आले असून फोनवरून शिवीगाळ केली असल्याची तक्रार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे दानवे यांनी दिली आहे. अज्ञात व्यक्तीने 15 मार्च रोजी रात्री 02 वाजता सतत कॉल करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद असून कापून टाकू आणि ठोकून टाकू असली धमकी दिल्याची अंबादास दानवे यांनी कळविले आहे. 11 12 13 आणि14 मार्च रोजी असेच कॉल आल्याचेही दानवे यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.