35 वर्षीय सीमा, 29 वर्षीय राहुल, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथ हत्येचं कारण समोर
ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर झालेली महिलेची हत्या (Ambernath Woman Murder) ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. मयत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा तिने लावल्यानंतर आरोपीने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते. सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला हात उसने पैसे दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सीमाने पैशासाठी तगादा लावला होता. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा सीमा कांबळने आरोपी राहुल भिंगारकर मागे लावल्याची प्राथमिक माहिती आहे.
अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या सीमा कांबळे या महिलेवर तिचा प्रियकर, राहुल भिंगारकर याने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली आहे.
महिला विवाहित, पतीपासून विभक्त राहायची
सीमा कांबळे ही विवाहित असून ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. सीमा आणि राहुल एकाच परिसरात राहत असून यांचे प्रेम संबंध जुळले. नंतर त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.
पैसे तरी दे नाहीतर लग्न तरी कर अशी मागणी सीमा राहुलकडे करायची. सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी राहुलने सीमावर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली.
सातत्याने गुन्ह्याच्या घटनेत वाढ
अंबरनाथ परिसरामध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये एका प्रकारचं भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी या घटनांना आवर घालावं आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.