अमेरिकेचा आमच्या तेलावर डोळा, विभाजन करत सत्तेवर मारायचाय ताव! इराणच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
अमेरिका आणि इस्रायलसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने गंभीर आरोप केले आहेत. इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघाई यांनी दावा केला आहे की अमेरिकेचे खरे उद्दिष्ट इराणला कमकुवत करणे, देशाचे विभाजन करणे आणि त्याच्या प्रचंड तेलसाठ्यांवर कब्जा करणे आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना बाघाई म्हणाले, “वॉशिंग्टनची योजना अगदी स्पष्ट आहे. इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणे, देशाचे विभाजन करणे आणि त्याच्या प्रचंड तेलसंपत्तीवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी असेही सांगितले की अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर हल्ला करून सर्व आंतरराष्ट्रीय नियम आणि राजनैतिक परंपरांचा भंग केला आहे.
Israel Iran War -ट्रम्पची नवी खेळी, इराणमध्ये ऑपरेशन लादेन आणि मादुरो सारखीच टीम करणार तैनात
बाघाई यांच्या मते, हे हल्ले त्या वेळी झाले जेव्हा इराण राजनैतिक चर्चेत सहभागी होत होता. त्यामुळे सुरू असलेल्या वाटाघाटींवर पूर्णपणे पाणी फिरले. “इराणने युद्ध सुरू केले नाही. आमच्यावर जबरदस्तीने लष्करी हल्ला करण्यात आला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांना आता ११ दिवस झाले आहेत आणि या काळात इराणची प्राथमिकता केवळ स्वतःचे संरक्षण करणे हीच आहे.
…तर तुम्हालाच भोगावे लागेल! सौदीने इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत दिला कठोर इशारा
बाघाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जोपर्यंत लष्करी हल्ले सुरू आहेत, तोपर्यंत युद्धबंदी किंवा कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटीचा प्रश्नच उद्भवत नाही. इराणी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने असेही म्हटले की, इराणी जनता देशाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. “इराणचे भविष्य इराणी जनतेच्या इच्छेने ठरेल. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी एकत्र उभे आहोत,” असे ते म्हणाले.
Comments are closed.