प्रवाशाकडून हवेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
शिकागोला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात एका प्रवाशाने हवेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानाचे फिनिक्समध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेचा तपास करत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाईन्सचे ‘Flight 1494’ हे विमान बुधवारी शिकागोला चालले होते. प्रवासादरम्यान, एका प्रवाशाने विमानाच्या पुढच्या भागात जाऊन गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांनी त्याला वारंवार जागेवर बसण्याच्या सूचना देऊनही त्याने दुर्लक्ष करत विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
अखेर वैमानिकाने विमानाचे फिनिक्स येथे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी, कर्मचारी आणि इतर प्रवाशांनी मिळून त्या व्यक्तीला नियंत्रित केले. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
Comments are closed.