जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांचे ‘टाळके’ गरम; उन्हामुळे मनस्ताप.. मेरिटाइम बोर्डाला जाग कधी येणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची बोटीतून चढउतार करताना होणारी कसरत थांबावी यासाठी 111 कोटी रुपये खर्चुन मोठी जेट्टी उभारली आहे. मात्र या अत्याधुनिक जेट्टीवर निवारा शेडच न बांधल्याने टळटळीत उन्हात बोटींची वाट पाहत पर्यटकांना आपले टाळके गरम करत उभे राहावे लागत असल्यामुळे अनेकदा काही पर्यटकांना भोवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही मेरिटाइम बोर्डाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक मुरुडमध्ये येतात. मात्र अत्याधुनिक जेट्टीअभावी बोटींमध्ये चढउतार करताना कसरत करावी लागत होती. हे लक्षात घेऊन मेरिटाइम बोर्डाने सागरमाला योजनेंतर्गत या ठिकाणी 111 कोटी रुपये खर्च करून भव्य जेट्टी बांधली आहे. परंतु जेट्टी बांधली असली तरी प्रवाशांना उभे राहण्यासाठी साधी निवारा शेड बांधलेली नाही. यामुळे पर्यटकांना ऊन-वारा-पावसात बोटींची वाट पाहत उभे राहावे लागते. राजपुरी जेट्टीप्रमाणे पत्र्याची शेड उभारल्यास जंजिरा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुरुडकरांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.