शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती, रोहित पवार यांचीही पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुपारी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

Comments are closed.