आता शरीर साथ देत नाहीय; बिग बी यांच्या पोस्टमुळे चाहते अस्वस्थ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढत्या वयामुळे शरीराला जाणवणाऱ्या मर्यादा आणि झोप न लागण्याच्या समस्येबद्दल ब्लॉगमध्ये लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चाहते अस्वस्थ झाले आहेत.

बिग बी म्हणाले, झोप येण्यासाठी इंटरनेटवर विविध प्रकार सांगितले आहेत. मी ते सर्व वापरून पाहिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटी नैसर्गिकरीत्या झोपण्याचा प्रयत्न करणेच उत्तम असते.

अशी आहे पोस्ट

'माझा व्यायामाचा दिनक्रम विस्कळीत झाला आहे, त्यामुळे मी तर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. सततच्या कामामुळे शरीर आणि मन थपून जाते. मन म्हणतेय, व्यायाम कर, पण शरीर म्हणते,'थांब जरा.' आता शरीर सह देत नाहीये. तरीही, मला प्रयत्न करायलाच हवा आणि मी तर करेन.'

Comments are closed.