Photo – शिवसेनेची मुंबईकरांना दिवाळी भेट

शिवसेनेच्या वतीने मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांअंतर्गत शिवसेनेकडून नागरिकांना दिवाळी भेटवस्तू, दिवाळी साहित्य वाटप व उटण्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेना पुणे संपर्कप्रमुख, नगरसेवक सचिन पडवळ यांच्या पुढाकाराने व शिवसेना शाखा क्र. 206 च्या वतीने दिवाळीनिमित्त प्रभागातील नागरिकांना सुगंधी उटणे वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 117 च्या नगरसेविका श्वेता पावसकर यांच्या वतीने नागरिकांना दिवाळीनिमित्त आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेना आमदार सुनील राऊत आणि बाबा कदम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक दीपक सावंत, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक, संदीप सावंत, योगेश पेडणेकर, अल्पिता वारंग, मोहिनी कुडकर, रजनी पाटील, राधेशाम गुप्ता, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते, सचिव, खासदार, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई व अदाणी स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, माजी आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली निमित्त अदाणी आस्थापनेतील अधिकारी व कर्मचाऱयांसाठी सुगंधी उटणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरचिटणीस मंगेश दळवी, युनियनचे अध्यक्ष वामन कदम, भारत दळवी, कैलास चव्हाण, सुभाष कावले, महेश कोयंडे, उदय परब स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी सुधाकर नर आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 217 चे शाखाप्रमुख शशिकांत पवार यांच्या वतीने नागरिकांना मोफत दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते राजकुमार बाफना, उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई संघटक माई परब, विधानसभा प्रमुख भैरू चौधरी (जैन), नगरसेविका संपदा मयेकर, जयश्री बाळ्ळीकर, सुरेखा उबाळे, वर्षा साबळे, वैभव मयेकर, प्रभाकर पाष्टे, प्रशांत पोटे, रोहित महाडिक, हरीश माळकर, विजय देवकर, सुशांत आगोंडे, परेश खारवा, हर्षवर्धन हांडे, विनायक गुरव आदी उपस्थित होते.

घाटकोपर पूर्व पंतनगर शिवसेना शाखा क्रमांक 131 च्या वतीने आयोजित दिवाळीनिमित्त सुगंधित उटणे वाटपाचा शुभारंभ विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घाटकोपर पूर्व उपविभागप्रमुख अजित गुजर, शाखाप्रमुख विशाल चावक, विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, ग्राहक संरक्षण कक्ष चिटणीस रमेश सावंत, युवासेनेचे स्वप्नील म्हात्रे, चंद्रकांत हळदणकर उपस्थित होते.

शिवसेना आमदार महेश सावंत यांच्या वतीने माहीम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, नगरसेवक निशिकांत शिंदे, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, अभय तामोरे आदी उपस्थित होते.

Comments are closed.