बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंधुदुर्ग जिह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील 25 वर्षीय तरुण सिद्धेश सुधीर सावंत याला ‘हॉजकिन लिंपह्मा’ या गंभीर पॅन्सरची लागण झाली आहे. त्याला डॉक्टरांनी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 18 लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. हालाखीच्या परिस्थितीमुळे एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने सावंत कुटुंबीयांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

वयाच्या दुसऱया वर्षी वडिलांचे छत्र हरपलेल्या सिद्धेशला आई सुप्रिया सावंत यांनी मोठय़ा कष्टाने मॅपॅनिकल इंजिनीअरपर्यंतचे शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभा राहत असतानाच त्याला पॅन्सरने गाठले. मागील एक वर्षापासून त्याच्यावर उपचार सुरू असून आतापर्यंत 15 वेळा केमोथेरपी देण्यात आली आहे. मात्र आजार पूर्णपणे बरा होत नसल्याने ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ करावे लागणार आहे. कमी रकमेच्या मदतीसाठी दात्यांनी QR कोडमार्फत सिद्धेशच्या बँक खात्यात मदत पाठवावी. तसेच 25 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीसाठी बॉम्बे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएसद्वारे रक्कम पाठवावी अशी विनंती सिद्धेशची आई सुप्रिया यांनी केली आहे.

येथे पाठवा मदत

बँकेचे नाव ः आयसीआयसीआय बँक. लाभार्थ्यांचे नाव ः बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट. चालू खाते क्र. (करंट अकाउंट) ः 000405142526. आयएफएससी कोड ः ICIC0000004. स्विफ्ट कोड ः ICICINBBNRI. ब्रँच ः 215, फ्री प्रेस हाऊस, नरीमन पॉइंट, मुंबई 400021. बॉम्बे हॉस्पिटल संपर्क ः022-22037124, 22092542. ईमेल ः [email protected], [email protected]

Comments are closed.