काळजी करू नका! दुष्काळग्रस्तांना मोदींचा शाब्दिक दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांची आज पुरती निराशा झाली. पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदतीची घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी कुठलीही घोषणा केली नाही. मदतीचा हात देण्याऐवजी काळजी करू नका, असा केवळ शाब्दिक दिलासा पंतप्रधानांनी दिला.

पुणे मेट्रो मार्गिका तीनचे लोकार्पण आणि मेट्रो टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री सोहळय़ात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांनी काळजी करू नये. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे मोदी मराठीत म्हणाले. ‘दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे देशवासीयांनी सण साजरा करताना त्या शेतकऱयांची आठवण ठेवावी, असा सल्लाही मोदींनी दिला.

Comments are closed.