बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स
अमिताभ बच्चन यांनी दोन आलिशान अपार्टमेंट विकले: बॉलिवूडचे (Bollywood News) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबईतील (Mumbai News) आपले दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत. इंडस्ट्रीचे मेगास्टार म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव (Goregaon) परिसरातील दोन आलिशान मालमत्ता विकल्या आहेत. या मालमत्ता विकून बिग बींनी रातोरात कोट्यवधींचा नफा कमावला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बींनी विकलेले हे दोन्ही अपार्टमेंट्स एका आलिशान निवासी टॉवरच्या 47व्या मजल्यावर आहेत. जर या फ्लॅट्सचा एकत्रितपणे विचार केला तर, हे अपार्टमेंट अंदाजे 3,640 चौरस फूट क्षेत्रफळाचे आहेत. हे फ्लॅट्स तब्बल 12 कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती मिळतेय. त्यानुसार, प्रत्येक अपार्टमेंटची नोंदणी 6-6 कोटी रुपयांना झालेली. ज्यावर तब्बल 60 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे.
वेगवेगळ्या पार्किंग स्पेससह मिळाले बायर्सना अपार्टमेंट (Buyers Got Apartments With Different Parking Spaces)
रिअल इस्टेट अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म CRE Matrix च्या कागदपत्रांनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे दोन्ही फ्लॅट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खरेदीदारांना विकलेत. गमतीशीर बाब म्हणजे, दोन्ही खरेदीदारांना प्रत्येकी एका कारसाठी पार्किंगची जागा देखील मिळाली. हे अपार्टमेंट गोरेगावच्या पश्चिम उपनगरातील एका प्रीमियम टॉवरमध्ये आहेत, ज्यावरून मुंबईचा शानदार व्यू पाहायला मिळतो.
जुहूमध्ये बिग बींचे पाच बंगले
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखलं जात असली तरी, त्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्येही केली जाते. बिग बींचा प्रॉपर्टी पोर्टफोलियो याचा पुरावा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याकडे मुंबईतील जुहू परिसरात पाच आलिशान बंगले आहेत. जलसा, प्रतीक्षा, जनक, वत्स आणि जलसाच्या पाठीमागेच आणखी एक प्रॉपर्टी आहे. जलसामध्ये बिग बी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. त्यापूर्वी ते प्रतीक्षामध्ये राहायचे. तर, जनक बंगला त्यांचं फॅमिसी ऑफिस म्हणून वापरला जायचा. तर, वत्स त्यांनी कमर्शियल यूजसाठी भाड्यानं दिला आहे.
गुंतवणूक, रिअल इस्टेटमध्येही तज्ज्ञ आहेत अमिताभ बच्चन
अभिनेते असण्यासोबतच, अमिताभ बच्चन हे एक हुशार गुंतवणूकदार देखील आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ चित्रपटांमध्येच नव्हे, तर मालमत्ता आणि स्टार्टअप्समध्ये अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. गोरेगावचा हा करार याच धोरणाचा एक भाग असल्याचं मानलं जातंय. या करारावरून हे सिद्ध होतं की, बिग बी केवळ पडद्यावरच नव्हे तर, त्यांच्या आर्थिक निर्णयांमध्येही तितकेच हुशार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.