अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट वि
अमोल कोल्हे: शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2026) आयोजित करण्यात आलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यातील (Pune News) शैक्षणिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे 20 फेब्रुवारी 2025 रोजी इरावती कर्वे सभागृहात कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल, असा आक्षेप घेतला आहे.
Amol Kolhe: विद्यार्थ्यांचा आक्षेप काय?
‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने कुलगुरूंना सह्यांचे पत्र देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाच्या सामूहिक चेतनेचा उत्सव असल्याचे नमूद करत, केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणे योग्य नसल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. कार्यक्रमाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा प्रकारच्या कार्यक्रमास समर्थन देते का, याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, तसेच हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Amol Kolhe: डॉ. कोल्हे समर्थनार्थही काही विद्यार्थ्यांचे पत्र
दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ कुलगुरूंना स्वतंत्र पत्र दिले आहे. दरवर्षी विद्यापीठात विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्त्यांना आमंत्रित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती म्हणून अमोल कोल्हे यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समर्थक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
Amol Kolhe: अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केलाय. मात्र, पुणे विद्यापीठाकडून मला अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आज चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझं कर्तव्य आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन मी अशा व्याख्यानाला जात असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.