नितेश राणे हिंदू धर्मरक्षक, रामायणात भरताने रामाचा सल्ला ऐकला, तुम्हीही भावाचं ऐका: मिटकरी

Nitesh Rane & Nilesh Rane: कोकणात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे आणि निलेश राणे या दोन बंधूंमध्ये वाद पेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कोकणातील शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना भाजपच सर्वश्रेष्ठ आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या नितेश राणे यांना शिंदे गटाचे आमदार असलेल्या निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सल्ला दिला होता. त्यावर नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही उत्तर दिले होते. नंतर निलेश राणे यांनी आपले ट्विट डिलिट करुन टाकले होते. यामुळे राजकीय वर्तुळात नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मंत्री नितेश राणे यांना एक सल्ला दिला आहे.

नितेश राणे हे मंत्री आहेत, हिंदू धर्मरक्षक म्हणून त्यांचा चेहरा प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मात रामाला सर्वश्रेष्ठ मानतात. राम आणि भरत यांचं नातं ग्रेट होतं, हा संस्कार देशात रुजलेला आहे. भरत लहान होता, राम मोठा होता. राम भरताला सल्ला द्यायचा, भरत त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा. इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. नितेश राणे लहान बंधू आहेत, निलेश राणे मोठे बंधू आहेत. ते हिंदू धर्मरक्षक आहेत,  त्यांनी रामायणाचा इतका भाग अंगीकारला पाहिजे. भावाने दिलेला सल्ला वडिलांच्या सल्ल्यानंतर सर्वोच्च मानला जातो. निलेश राणे यांनी नितेश यांना सल्ला दिला आहे. आपल्या बोलण्यातून महायुतीत बिघाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. निलेश राणे यांचा हा सल्ला नितेश यांन मानावा. बाकी मी त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

यावेळी अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजना बंद करुन त्याचे पैसे ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावेत, असे वक्तव्य करणारे शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांच्याबाबतही भाष्य केले. महायुती सरकारला लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्याबाबत एकमत आहे. संजय गायकवाड यांच्याशी त्यांचे नेते एकनाथ शिंदे बोलतील, असे मिटकरी यांनी म्हटले.

MLA Nilesh Rane: निलेश राणेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याच्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असा रिप्लाय नितेश राणे यांनी दिला होता. यावर नितेश राणे यांनीही ट्विट केलं होतं. निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असे नितेश यांनी म्हटले होते. यानंतर निलेश राणे यांनी आपली पोस्ट डिलिट केली होती.

Maharashtra Politics: निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय?

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणे यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते.  नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी सल्ला दिला होता. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हा नियोजन समितीमधील निर्णयांवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद आहेत.

https://www.youtube.com/watch?v=6vqn7tkysgo

आणखी वाचा

“निलेशजी तुम्ही tax free आहात,” नितेश राणेंच्या रिप्लायनंतर निलेश राणेंकडून पोस्ट डिलीट

आणखी वाचा

Comments are closed.