EVM चा फायदा ठराविक पक्षांनाच कसा होतो? सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मिटकरींची मागणी
अमोल मिटकरी: काल लागलेल्या महापालिका निवडणूक निकालांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर वगळता पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं मोठं पानीपत झालं आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आता मोठी मागणी केली आहे. राज्यातील यापुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी मिटकरी यांनी केलीय आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला आपल्यावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं ते म्हणाले.
ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो?
आमदार मिटकरींनी ‘बॅलेट’वर मतदान घेण्याची मागणी करत विरोधकांच्या सुरात सुर मिसळला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करुनही आमच्या पक्षाचा पराभव कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उस्थित केला आहे. ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
कुटुंब म्हणून पवार कुटुंबिय हे कायमच एक
दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक हा दैनंदिन प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणालेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील असं ते म्हणालेत. दरम्यान, कुटुंब म्हणून पवार कुटुंबिय हे कायमच एक असल्याचंही ते म्हणालेत.
29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपला मोठं यश
राज्यातील काल (शुक्रवारी ता 16) जाहीर झालेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपलाच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांनाही जोरदार यश मिळाले आहे. भाजपने (Pune Municipal Corporation Result) जवळपास 9 महापालिकांवरती स्वबळावर सत्ता स्थापन करत येईत इतका आकडा गाठला असून 29 पैकी 24 महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले आहे. काही ठिकाणी सत्ता (Pune Municipal Corporation Result) स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची सोबत घ्यावी लागणार आहे. महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या आहेत. (Pune Municipal Corporation Result) तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे यांना आपल्या आधीच्या जागा देखील मिळवता आल्या नाहीत. अजित पवार गटाचीही स्थिती काहीशी तशीच आहे. काँग्रेसल्या त्यातल्या त्यात बऱ्या जागा मिळाल्या आहे, पण त्यांचीही कामगिरीही मागील वेळेपेक्षा सुमार राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मराठी Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
आणखी वाचा
Comments are closed.