आम्ही दोन वर्षे…मराठमोळे अमोल मुझुमदार नरेंद्र मोदींना काय काय म्हणाले?, VIDEO
नरेंद्र मोदी महिला टीम इंडियासोबत अमोल मुझुमदार: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (Indian Women Cricket Team) जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने काल (5 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंसह मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar With Narendra Modi) यांच्यासोबतही संवाद साधला. यादरम्यानचा व्हिडीओ नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या संघाला लोक कल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले. यावेळी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) भेटीदरम्यान भावूक झाले. आम्ही दोन वर्षांपासून काम करत होतो आणि अखेर हा दिवस आला, असं अमोल मुझुमदार यांनी सांगितले.
मराठमोळे अमोल मुझुमदार नरेंद्र मोदींना काय काय म्हणाले? (Amol Muzumdar With Narendra Modi)
मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीदरम्यान प्रथम भाषण केले. ते म्हणाले, “आम्ही दोन वर्षांपासून काम करत आहोत, सर… या मुलींनी अविश्वसनीय मेहनत घेतली. संघाच्या खेळाडूंनी प्रत्येक सराव सत्रात प्रचंड आक्रमकता दाखवली आहे. सर्व खेळाडू उर्जेने मैदानात उतरले. त्यामुळे मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले आहे, असं अमोल मुझुमदार यांनी सांगितले.
टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचा प्रत्येक भारतीयाला प्रचंड अभिमान वाटतो. महिला क्रिकेट संघाशी संवाद साधताना खूप आनंद झाला. पहा! https://t.co/PkkfKFBNbb
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 6 नोव्हेंबर 2025
कोण आहेत अमोल मुझुमदार? (Who Is Amol Muzumdar)
अमोल अनिल मुझुमदार हे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) आहेत. मुझुमदार यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले नाहीत, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. अमोल मुझुमदार यांनी शाळेतच असताना सचिन तेंडुलकरच्या संघात खेळून प्रचंड धावांचा विक्रम केला होता. अमोल मुझुमदार यांनी 1993 साली रणजी सामन्यात मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात अमोल मुझुमदार यांनी मुंबईसाठी 260 नाबाद धावा केल्या, हा त्या काळातील विक्रम होता. अमोल मुझुमदार मुंबईसह आंध्र प्रदेश आणि आसामच्या संघाकडूनही रणजी सामने खेळले. 2013 मध्ये आंध्र प्रदेशकडून अमोल मुझुमदार यांनी शेवटचा रणजी सामना खेळला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.