तक्रारदाराकडे 3 लाख मागितले, 1 लाख घेताना पोलीस ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल

यवतमाळ : प्रशासकीय वर्तुळात मग त पोलीस (Police) खाते असो किंवा महसूल विभाग लाच (Bribe) घेण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या आठवडाभरात एसीबीने केलेल्या विविध कारवायांमध्ये लिपिकापासून ते तहसीदारांपर्यंत अनेकांना रंगेहात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. आता, पोलीस ठाण्यातील एका ठाणेदारास 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नरेश रणधीर असे लाचखोर पोलिसांचे नाव असून यवतमाळ जिल्ह्यातील अवधुतवाडी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत.

उधारीचे पैसे परत न केल्याने एका व्यक्तीने अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, ही रक्कम वसूल करण्यासाठी 3 लाखांची लाचेची मागणी ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदाराकडे केली होती. त्यातील 1 लाख रुपये स्वीकारताना ठाणेदार महोदयास रंगेहात पकडण्यात आले. अमरावती लाचलुचपत विभागाने ही कारवाई अवधुतवाडी पोलिस ठाण्यातच केली. याप्रकरणी ठाणेदार रणधीर यांच्यावर अवधुतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मित्राला पैशाची गरज होती, त्यामुळे तक्रारदाराने मध्यस्ती करून दुसर्‍यांकडून 10 लाख रुपये उसणवारीवर घेऊन त्याला दिले होते. परंतु, दिलेले पैसे परत मागितल्यानंतर तो उडवा उडवीचे उत्तरे देत होता. सहा महिने लोटले तरी पैसे परत दिलेच नव्हते. शेवटी तक्रारदाराने अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु, पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांनी तक्रारदाराला 5 लाख रुपयांच्या मागणी केली होती. त्यानंतर, पडताळणीवेळी 3 लाखांची मागणी केल्याची बाब उजेडात आली होती. त्या अनुषंगाने अमरावती लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता 1 लाख रुपये लाच स्वीकारताना ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अमरावती लाचलुचपत विभागाच्या या कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार

आणखी वाचा

Comments are closed.