गर्लफ्रेंडचे लग्न ठरत असल्याचं कळताच प्रियकर संतापला, वडिलांवर जीवघेणा हल्ला, आईलाही सोडलं नाह


अमरावती: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीचे लग्न ठरण्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या माजी प्रियकराने संतापातून थेट मुलीच्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून आईलाही मारहाण करण्यात आली आहे. (Crime  news)

लग्न ठरण्याचा राग, प्रियकराचे संतापजन्य कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत (32) नावाच्या तरुणाचे एका मुलीसोबत पूर्वी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी त्याने त्या मुलीला पळवून नेले होते. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मुलगी तेलंगणातून परत आणल्यानंतर भारत तीन महिने तुरुंगातही राहिला होता.काही दिवसांपूर्वी ती मुलगी 18 वर्षांची झाली आणि कुटुंबीयांनी तिच्या लग्नाची बोलणी सुरू केली. सोमवारी दुपारी एका मुलाने तिला पाहण्यासाठी घर गाठले. ही बाब समजताच माजी प्रियकर भारत संतापला.

धारदार शस्त्रांनी हल्ला

संध्याकाळी जेवणानंतर मुलीचे वडील फेरफटका मारत बाहेर गेले असताना भारत आणि त्याचा साथीदार अक्षय (३०) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत वडिलांच्या हात, डोके आणि बोटांना दुखापत झाली आहे. मुलीच्या आईने पतीच्या मदतीसाठी धाव घेतली असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यादरम्यान मुलीच्या वडिलांनी स्वतःचा बचाव करताना विट मारून भारतला जखमी केले. त्याचे दात पडले असून तोही गंभीर अवस्थेत आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हे दाखल, आरोपी पसार

या घटनेत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भारत आणि अक्षयविरुद्ध प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि मारहाण अशा कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. सध्या भारत उपचार घेत आहे, तर अक्षय फरार असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार डॉ. अनुप वाकडे यांनी दिली.या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, एका मुलीच्या लग्नाच्या रागातून घडलेला हा हिंसक प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.