कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड
अमरावती क्राईम न्यूज : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विनोद राऊत (वय 52 वर्ष) यांचा मोर्शी येथील तालुका फळरोप वाटिका येरला विभागाच्या जागेवर गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाली असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे सायकल गतिमान करत आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नावं धनराज वानखडे असून आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसारमृतक विनोद राऊत यांच्या डोक्यावर पायावर लोखंडी सळाखीने मारहाण केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. यासह बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली आहे. या संदर्भात पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे. फक्त या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Alibag Crime : भेकरची शिकार प्रकरणी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाच्या घरी मांस सापडल्याने खळबळ
अलिबाग मधील अजित दादांच्या राष्ट्रवादीचे अलिबाग तालुकाध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय जयेंद्र भगत यांना भेकर शिकार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. भगत यांच्या घरामध्ये भेकर प्राण्याचे किलोभरहून अधिक जिवंत मांस सापडले आहे. मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात जयेंद्र भगत यांनी भेकराची शिकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून भगत यांना पकडले. त्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याचे मांस त्यांचे घरामध्ये आढळून आलय. पोलिसांनी जप्त केलेले भेकराचे मास आणि जयेंद्र भगत यांना वनविभागाच्या ताब्यात दिले असून या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागामार्फत सुरू आहे.
Mumbai International Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाईची
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) सीमा शुल्क विभागाने (Customs Department) मोठी कारवाई करत प्राणी तस्करीचा (Animal Smuggling) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी झरीन शेख (Zareen Shaikh) नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने झरीन शेख नावाच्या महिला प्रवाशाला अटक केली असून, तिच्याकडून तस्करी करण्यात आलेले 154 प्राणी जप्त करण्यात आले आहेत. थायलंडमधून आणलेल्या या प्राण्यांमध्ये चार लहान अॅनाकोंडा (Anaconda), इग्वाना (Iguana), कासव (Tortoise) आणि विविध प्रजातींच्या सरड्यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी डब्यांमध्ये भरून सुटकेसमध्ये लपवून आणले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाळीव प्राण्यांच्या वाढत्या मागणीमुळे अशा प्रकारची तस्करी वाढत आहे. जप्त केलेले प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत आणि त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाईल.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.