कोण जास्त मुली पटवणार? अयान-उझरमध्ये पैज, पैशावरून वाद झाला; रागामुळं मित्राचे 18 आक्षेपार्ह व्
अमरावती : अमरावती : अमरावतीच्या परतवाडामध्ये (Amravati Crime News) तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी शर्यत दोन आरोपींमध्ये लागली होती अशी माहिती समोर आली आहे. परतवाडा (Amravati Crime News) लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यात ही शर्यत लागली होती अशी माहिती समोर आली आहे. यावेळी आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता.(Amravati Crime News)
अमरावती क्राईम न्यूज : शर्यत वाद अन् व्हिडीओ व्हायरल..
दरम्यान काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाला आणि या पैशाच्या वादातूनच रागाच्या भरात उझेर खान याने अयान अहमदचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे सुरुवात केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे आणि तिथूनच हे परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणातील दोन मख्य आरोपी अयान अहमद आणी उझैर खान यांच्या आपापसातील वादामूळेच अखेर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.(Amravati Crime News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरुपी ‘शर्यत’ लागली होती की, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. पुढे या शर्यतीचे रुपांतर एका विकृत छंदात झालं. दोघं आपल्या घाणेरड्या कृत्यांचे व्हिडीओ करायचे आणि ते व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करायचे.
अमरावती क्राईम न्यूज : मित्राची रूम काही तासांसाठी भाड्याने घेऊन…
मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्याने घेऊन तिथे मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. अयानने चौकशीवेळी पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितलं की, त्याने अमरावती येथील त्याच्या एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर घेऊन जाऊन दोन मुलींचे लैंगिक (Amravati Crime News) शोषण केले आहे. या कामासाठी तो मित्र आरोपी अयानला काही तासांसाठी आपली (Amravati Crime News) रूम देत असे. पोलिसांनी या रूम देणाऱ्या मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Crime News)
परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अयान अहमद याचे मित्र असलेले अजून चौघांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता एकूण आठ आरोपींना परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अजून काही जणांची पोलीसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. अयान अहमद याच्या मित्रांनी व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.(Amravati Crime News)
Amravati Crime News: अटक आरोपींची साखळी
१६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत पोलिसांनी एकूण चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.
अयान अहमद तनवीर अहमद (१९) : मुख्य आरोपी (अत्याचार करणारा).
उजेरखान इकबाल खान (२०) : व्हिडिओ डाऊनलोड करून व्हायरल करणारा.
मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२) : व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर करणारा.
तरबेज खान तसलिम खान (२४) : व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग.
चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.
Amravati Crime News: ४५ सदस्यांची एसआयटी
आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.