अशोक खरातवर ED आणि इन्कम टॅक्सचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; घरात सापडल्या बेनामी व्यवहारांच्या ‘कच्च्य

अशोक खरात क्राईम न्यूज: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाने (Income Tax) खरातच्या घरावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. फसवणूक आणि खंडणीतून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवून खरातने एक मोठे आर्थिक जाळे विणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Ashok Kharat Crime News: कच्च्या नोंदणी व्यवहारातून भोंदू खरातचे बेनामी व्यवहार उघड

तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या घरात मालमत्तेच्या ‘कच्च्या नोंदी’ असलेली कागदपत्रे सापडली आहेत. शासकीय नोंदणी न करता केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मालमत्तांचे व्यवहार करून खरातने अनेक जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. कराची चोरी करण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी मालमत्तांची अधिकृत नोंदणी (Registration) न करता केवळ कच्च्या पावत्यांवर हा व्यवहार सुरू होता.

Ashok Kharat Crime News: 10 कोटींची प्रॉपर्टी आणि मनी लाँड्रिंगचा संशय

धाडीदरम्यान तपास यंत्रणांनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मनी लाँड्रिंगसाठी काही ‘शेल कंपन्या’वापरल्या गेल्याचा संशय असून, त्या माध्यमातून व्यवहारांचे वळण फिरवण्यात आले आहे. अशोक खरात विरोधात आता तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. शेल कंपन्या, बनावट व्यवहार आणि नोंद न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे, बँक खाते, CDR आणि आयकर रिटर्नची छाननी सुरु आहे. त्यामुळे खरात विरोधात तपासाचा फास आवळत चालला असून मनी लाँड्रिंगचे आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kalpana Kharat: खरातच्या पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

दरम्यान, अशोक खरातवर विविध गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याच्या पत्नीवरही गुन्हे दाखल असून कल्पना खरात (Kalpana Kharat) अद्याप फरार आहे. न्यायालयात कल्पना खरात हिच्या अटकपूर्वक जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू असून, शुक्रवारी पुन्हा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता पुढील सुनावणी आता 22 एप्रिल रोजी होणार आहे. आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असताना देखील वकिलांच्या विनंतीवरुन ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितला वेळ मागितला. मूळ फिर्यादीच्या विनंतीनंतर न्यायालयाने ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात ‘गुन्ह्यांची हॅटट्रिक’; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.