अमरावती विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट! काँग्रेसचे हर्षजीत देशमुख थेट प्रचारात उतरणार नाही, न
अमरावती विधान परिषद निवडणूक 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या (Amravati Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख (Harshjit Deshmukh) हे आता प्रकृती अस्वस्थतेमुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास असल्याचे समोर आले असून, डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे.
Amravati Vidhan Parishad Election 2026: दोन किडनी स्टोन आणि डॉक्टरांचा सक्तीचा आराम
आपल्या प्रकृतीबाबत आणि भूमिकेबाबत स्वतः हर्षजीत देशमुख यांनी रुग्णालयातून मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरात 11 मिमी आणि 6 मिमी आकाराचे दोन किडनी स्टोन आढळून आले आहेत. यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील आठ दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि प्रचार दौऱ्यात दिसणार नाहीत.
Amravati Vidhan Parishad Election 2026: “मागच्या 8 दिवसांपासून पक्षाशी संवादच नाही!”
धक्कादायक बाब म्हणजे “मागच्या आठ दिवसांपासून माझा अमरावतीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी कोणताही संवाद झालेला नाही. इतकेच नव्हे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्याशी माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी किंवा नंतर, अगदी या क्षणापर्यंत कोणताही संवाद झालेला नाही. माझे नाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी सर्वपक्षीय संमतीने सूचवले होते,” असे देखील हर्षजीत देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Amravati Vidhan Parishad Election 2026: यशोमती ठाकूर यांच्या ‘मॅनेज’ आरोपांवर दिली प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आपलाच उमेदवार 15 ते 20 कोटी रुपयांमध्ये ‘मॅनेज’ झाल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या आरोपावर स्पष्टीकरण देताना हर्षजीत देशमुख म्हणाले की, “यशोमती ठाकूर या केवळ रागाच्या भरात असे बोलून गेल्या. मात्र, त्यानंतर माझ्यावर पक्षातील कोणीही (अधिकृतपणे) आरोप केलेले नाहीत.”
Amravati Vidhan Parishad Election 2026: काँग्रेस-वंचितच्या ‘गुप्त’ बैठका
एकीकडे हर्षजीत देशमुख हे रुग्णालयातूनच निवडणूक लढण्यावर ठाम असताना, अमरावती काँग्रेसने मात्र पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अंतर्गत बैठक घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत एक ‘गुप्त बैठक’ घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. वंचितच्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. तर पक्षाने जरी वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर कोणाला पाठिंबा दिला, तरी आपण अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणातून मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका हर्षजीत देशमुख यांनी घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Comments are closed.