अमेरिकन कंपनीचा अवघा 5 मिनिटांचा गूगल मीट कॉल, 80 हिंदुस्थानी कर्मचारी बेरोजगार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एका अमेरिकन वित्तीय कंपनीने केवळ पाच मिनिटांच्या गूगल मीट कॉलद्वारे संपूर्ण हिंदुस्थानी टीमला कामावरून काढून टाकल्याचा धक्कदायक प्रकार घडला. ऑपरेशनल कारण देत त्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले होते. मग कोणतीही पूर्वसूचना न देता शिफ्टदरम्यान गूगल मीट कॉलद्वारे कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे 80 कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

एका कर्मचाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “Laid off over a Google Meet” या शीर्षकाखाली पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. कालपर्यंत मी एका अमेरिकन बँकेसाठी कस्टमर सपोर्ट टीमचा भाग होतो. ऑपरेशनल कारणांमुळे त्यांनी आम्हाला काल घरून काम करण्यास सांगितले होते, असे कर्मचाऱ्याने लिहिले आहे.

संध्याकाळी 6.30 वाजताची शिफ्ट सुरू होऊन तीन तास झाले होते. रात्री 9.30 वाजता वरिष्ठ व्यवस्थापनाने टीमला एका व्हर्च्युअल कॉलसाठी बोलावले आणि त्यात संपूर्ण हिंदुस्थानी कस्टमर टीमला नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी देण्यात आली, असे कर्मचाऱ्याने पुढे नमूद केले.

फक्त 5 मिनिटांच्या एका कॉलमुळे 80 कर्मचाऱ्यांचे आयुष्य बदलले, 80 कुटुंबे प्रभावित झाली. आपण अशा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करतो ज्या आपल्याला कधीही बाहेर काढू शकतात, याचे वाईट वाटते. मी माझ्या नोकरीत इतकी प्रामाणिक मेहनत का केली, याचा आता पश्चात्ताप होत आहे, असे पुढे कर्मचाऱ्याने म्हटले आहे.

Comments are closed.