अग्निवीरांसाठी दोन वर्षांच्या मुदतवाढीची ऑफर?

सैन्यात तीन प्रकारचे सैनिक असणार : मुदतवाढ देण्याची तयारी सुरू

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती योजनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्मयता आहे. अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवाकाळ 21 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत असून, त्यापूर्वी या योजनेतील बदलांची घोषणा होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या कालावधीसाठी अग्निवीरांची भरती केली जाते. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कामगिरी, पात्रता आणि लष्कराच्या गरजेनुसार 25 टक्क्मयांपर्यंत अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेतले जाते. उर्वरित अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाते.

आता या उर्वरित अग्निवीरांपैकी काहींना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोणत्या दलातील किती अग्निवीरांना ही संधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुदतवाढीनंतर सैन्यात तीन प्रकारचे सैनिक

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास सैन्यात तीन प्रकारचे सैनिक असतील. यामध्ये चार वर्षांच्या सेवेत असलेले अग्निवीर, मुदतवाढ मिळालेले अग्निवीर आणि नियमित सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट झालेले सैनिक यांचा समावेश असेल. नौदलातील अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवाकाळ 21 नोव्हेंबर रोजी, हवाई दलातील अग्निवीरांचा 21 डिसेंबर रोजी, तर सैन्यातील अग्निवीरांचा 31 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.

अग्निवीर योजनेतील सध्याची तरतूद काय?

-अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांना चार वर्षे सेवा करावी लागते. या कालावधीत प्रशिक्षणाचाही समावेश असतो. चार वर्षांनंतर नियमित सेवेसाठी निवड न झालेल्या अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाते.

-सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेजअंतर्गत व्याजासह सुमारे 11.71 लाख ऊपये एकरकमी दिले जातात. या निधीमध्ये अग्निवीरांच्या वेतनातून जमा झालेली रक्कम आणि केंद्र सरकारचे समान योगदान समाविष्ट असते.

-याशिवाय अग्निवीरांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते. चार वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांना 48 लाख ऊपयांचे जीवन विमा संरक्षणही मिळते. मात्र, सेवेतून मुक्त झालेल्या अग्निवीरांना नियमित पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळत नाही.

-अग्निवीर योजनेत संभाव्य बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने मुदतवाढीची अंतिम तरतूद आणि तिची अंमलबजावणी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.